मराठा आरक्षण मिळाल्याने जामखेडमध्ये रॅली काढून जल्लोष

जामखेड – मराठा समाजाला सरकारने दिलेल्या 16 टक्‍के आरक्षणाचे स्वागत करीत, भारतीय जनता पार्टी तर्फे पंचायत समिती कार्यालयापासून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. ही रॅली खर्डा चौकात आली असता, भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलताशे लावून मिरवणूक काढून खर्डा चौकात फटाके फोडून जोरदार जल्लोष केला.

या रॅलीत पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, युवा नेते सुर्यकांत मोरे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, बाजार समिती संचालक सागर सदाफुले, महादेव डुचे, भाजपा शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, नगरसेवक हृषीकेश बांबरसे, केशव वनवे, लहु शिंदे, रामा रसाळ, उध्दव हुलगुंडे, प्रविण चोरडिया, शरद हजारे, विठ्ठल राळेभात आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी फडणवीस सरकारचे आभार मानले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 42 अंदोलक शहीद झाले असुन सकल मराठा समाज दु:खात आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कसे टिकेल याकरिता प्रयत्न करावेत. न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळण्याचा मार्ग ज्या दिवशी मोकळा होईल, त्यादिवशी खऱ्या अर्थाने सकल मराठा समाज जल्लोष करेल अशी भावना सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
83 :thumbsup:
108 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)