आरोग्य सुविधांसाठी कर्जत-जामखेडला 30 कोटी 

राशीन (ता. कर्जत) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन करताना पालकमंत्री प्रा. राम शिंदे व इतर मान्यवर.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे : राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 कोटी 80 लाख खर्चाच्या इमारतीचे भूमिपूजन

कर्जत – कर्जत-जामखेड तालुक्‍यातील आरोग्य विभागासाठी तीस कोटीपेक्षा अधिक निधी दिला आहे. राशीन भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी येथील विकासकामांना अधिक महत्त्व दिले, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 कोटी 80 लाख खर्चाच्या इमारतीचे भूमिपूजन व कर्मचारी निवास्थान पायाभरणीप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मीरा देशमुख होत्या.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. तुम्ही मते दिल्यानेच सत्तेत गेल्यानंतर मतदारसंघातील लोकांना न्याय मिळून देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. 20 वर्षापासून कुकडीच्या रखडलेल्या चार हजार कोटींच्या कामांना मंगळवारी मान्यता मिळेल. हायब्रीज ऍम्युनिटी अंतर्गत शेवगाव-अमरापूर-भिगवण राज्यमार्गाचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

बरेच प्रशासकिय अडथळे पार करून पालकमंत्र्यांनी राशीनसाठी भरीव निधी दिल्याचे राजेंद्र देशमुख या वेळी म्हणाले.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, डॉ. सी. एम. बोरा, सभापती बापूराव शेळके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डी. ए. कवळे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. भिमराव साळवे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)