शेतकऱ्यांवर महावितरणचे सुलतानी संकट

जवळा(ता.जामखेड) - शाॅर्ट सर्कीटने सहा एकर ऊस जळून खाक झाला.

शॉर्टसर्किटमुळे एक महिन्यात पाच शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

जवळा – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथे शॉर्टसर्किटने ऊस जळण्याचे सत्र सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी जवळ्यामध्ये गावालगत असणाऱ्या राजेंद्र मोहनलाल मंडलेचा यांचा 4 एकर तर दीपक भास्कर महाजन यांचा 2 एकर असे 6 एकर ऊस शॉटसर्किटने जळून खाक झाले.

सुमारे दुपारी दोन वाजता आग लागली असल्याने, गावामध्ये धुराची लाट सुरू झाल्याने गावातील ग्रामस्थांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्‍यात आणणे शक्‍य झाले नाही, यामध्ये 6 एकर ऊस आगीत जळून खाक झाला. या दोन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सहा एकर उसामध्ये पाणी देण्यासाठी ड्रीपरचा वापर करण्यात आला होता. तेही आगीत खाक झाल्याने हे दोन्ही मोठे नुकसान झाले. दुुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली.

“महावितरणने जवळा परिसरातील जीर्ण झालेल्या तारा तत्काळ दुरुस्त कराव्यात. तसेच कारखान्याने वाढीव टोळ्या पाठवून तत्काळ शेतकऱ्यांचा ऊस तोडून न्यावा.
– वैशाली शिंदे, सरपंच जवळा

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे याआधी पंकजकुमार पंढरीनाथ सुरवसे यांचा 1 एकर तर, कुसूम बबन लेकुरवाळे यांचा 1 एकर तसेच, बाळू गणपत रोडे यांचा 1 एकर त्याचबरोबर गुरुदास निवृत्ती लेकुरवाळे यांचा 1 एकर असा येथील एका महिन्यात पाच शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळून खाक झाला. अस्मानी संकटांबरोबर महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

विद्युत तारेमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची या घटना घडल्या आहेत. दुष्काळात पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आलेले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने यामध्ये जवळपास पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. दुष्काळ सदृश परिस्थितीसमोर असताना या ओढवलेल्या संकटांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)