जामखेड तालुक्यातील ‘जवळा ग्रामपंचायती’वर महिलाराज

वैशाली सुभाष शिंदे यांची सरपंचपदी तर, उपसरपंचपदी आशाबाई प्रविण लेकुरवाळे यांची निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना. (छाया-संदेश हजारे)

सरपंचपदी शिंदे तर, उपसरपंचपदी वाळुंजकर

जवळा – जवळा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रोहिणी वाळुंजकर यांची निवड करण्यात आली.  सरपंच वैशाली सुभाष शिंदे यांचा पदग्रहण कार्यक्रम व उपसरपंचपदाची निवडणूक झाली, उपसरपंच पदासाठी दोन अर्ज होते, यामध्ये रोहिणी काकासाहेब वाळुंजकर यांचा व आशाबाई प्रविण लेकुरवाळे असे दोन अर्ज उपसरपंच पदासाठी आले होते. यावेळी हात वर करून मतदान झाले, त्यानुसार 13 मते वाळुंजकर यांना मिळाली असून तीन मते आशा लेकुरवाळे यांना मिळाली. त्यानुसार रोहिणी काकासाहेब वाळुंजकर यांची वर्णी लागली.

“दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागणार असून तत्काळ टॅंकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून लवकरच पाणी टंचाईवर मात करणार आहोत, व जवळेकरांची पाणी टंचाईपासून सुटका करणार आहोत.            -वैशाली शिंदे , सरपंच, जवळा.

-Ads-

यावेळी जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख श्रीरंग कोल्हे, डॉ. महादेव पवार, ज्योती क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अजिनाथ हजारे, जामखेड पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, माजी सरपंच शहाजी पवार, मारुती शिंदे, मुरलीधर हजारे, प्रदीप पाटील, बाजीराव पठाडे, बिभिषण लेकुरवाळे, सुखदेव रोडे, प्रशांत शिंदे, प्रभाकर वाळुंजकर, गौतम कोल्हे, आयुब शेख, डॉ. इश्वर हजारे, शांतलिंग कथले, परमेश्वर कोल्हे, केशव हजारे, महादेव आव्हाड, किशोर वाळके, शिवाजी कोल्हे, परमेश्वर कोल्हे, अरुण आनंदकर, अमोल हजारे, अनिल पवार, भाऊसाहेब सूळ, दशरथ कोल्हे, किरण वरपे, सुभाष शिंदे, शरद हजारे, दीपक देवमाने, दयानंद कथले, संतोष हजारे, सुशील आव्हाड, रामभाऊ होले, दत्ता रोडे, दत्ता शेणमारे, आनंद जैन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र शिंदे, तलाठी काळे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य आरती देवमाने, शिल्पा कथले, सरुबाई हजारे, सीताबाई रोडे, प्रियांका आव्हाड, आशाबाई लेकुरवाळे, सुशीला मते, वैशाली धोत्रे, तसेच दिलीप वाळुंजकर, नवनाथ शिंदे, राष्ट्रपाल आव्हाड, नवनाथ कोल्हे, एकनाथ हजारे, शब्बीर शेख आदी सदस्य उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)