झेडपीच्या शिक्षकाचा मुलीवर सहा वर्षांपासून अत्याचार

खोटे लग्न करून मुलीचे लैंगिक शोषण : मारहाण आणि छळाबरोबर जीवे मारण्याची धमकी

जवळा – नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाने गावातील मुलीवर केलेला अत्याचाराचा हा प्रकार सहा वर्षांपासून सुरू होता. या शिक्षकाने मुलीशी खोटे लग्न केले. त्यानंतर तिला मारहाण व छळही केला. शेवटी अत्याचाराच्या या परिसीमेची कथणी मुलीने जामखेड पोलिसांसमोर केली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार करणारा नराधम शिक्षक रवीकिरण भास्कर भोजणे (रा. हिप्परगाव ता. औसा, जि. लातूर) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

फिर्यादी मुलीने म्हटले आहे, मी सहावीमध्ये शिकत असताना गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रवीकिरण भास्कर भोजणे बरोबर ओळख झाली. मी नववीत असताना 31 ऑगस्ट 2012 रोजी दुपारी 2.30 वाजता घरी जात असताना चुलत भावाची पालक म्हणून सही करण्यासाठी शाळेत बोलावले. शाळेत गेले असता मला एका खोलीत नेऊन खिडक्‍या व दार बंद केले. जबरदस्तीने बलात्कार केला व सदर प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारीन अशी धमकी दिली.

तेंव्हापासून 14 जुलै 2016 पर्यंत सतत धमकी देत शाळेत व गावातील खोलीवर बोलावून घेत अत्याचार केला. बदनामी होऊ नये म्हणून मी सहन केले. माझे 15 जुलै 2016 मधे लग्न जमले, तु लग्न करू नकोस मी तुझ्याशी लग्न करतो अन्यथा हा प्रकार सर्वाना सांगेन अशी धमकी दिली. माझे 18 डिसेंबर 2016 रोजी लग्न झाले. नवऱ्याला व सासऱ्याला सर्व प्रकार सांगेन असा फोन करून सतत दम दिला. आई वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून मी घटस्फोट घेऊन हळगांव येथे राहू लागले.

16 ऑगस्ट 2017 रोजी मला पुण्यात शिकण्यासाठी पाठवले व एमपीएससीचे क्‍लास लावतो म्हणाला, तो पुण्यात येऊन लॉजवर नेऊन 27 ऑगस्ट 2017 ला दोन महिने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. मी गर्भवती असल्याचा संशय आल्याने शिरूर येथे डॉक्‍टरांकडे जाऊन गर्भनिरोधक गोळ्या खाण्यासाठी दिल्या. त्यानंतर 29 जानेवारी 2018 पासून श्रीगोंदे येथील लॉजवर नेवून 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत तेथे ठेवले. तेथेही अत्याचार केला. 1 एप्रिल 2018 रोजी कर्जत येथील लॉजवर ठेवले व अत्याचार केला. पुन्हा गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. नंतर जामखेड येथे एका खोलीवर ठेवले.

माझ्याशी लग्न कधी करतो, तु माझा सतत उपभोग घेतोस, असा लग्नाचा तगादा लावल्याने 18 जुलै 2018 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, आळंदी ता. खेड, जिल्हा पुणे येथे नेऊन लग्न केले. नंतर जामखेड येथे आम्ही एकत्र राहू लागलो. तो मला सतत मारहाण करू लागला. गळा दाबून तुला जीव मारीन तुझा माझा काही संबंध नाही मी तुझ्याशी
खोटे लग्न केले आहे, मला विसरून जा. माझ्या वाट्याला गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. लग्नाच्या आमिषाने माझी फसवणूक केली आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2012 पासून 29 सप्टेंबर 2018 पर्यंत सहा वर्षे भोजणे याने मला वेळोवेळी हळगांव येथील कापसे वस्ती शाळेत, हळगाव येथिल खोलीवर तसेच पुणे, श्रीगोंदे, कर्जत येथील लॉजवर नेऊन अत्याचार केला. ब्लॅकमेल करून बदनामी करुन मला सोडून देऊन माझी फसवणूक केली आहे, अशी फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)