शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची वेळ सरकारने आणली : पवार

हमी भाव खरेदी केंद्रासाठी तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

जामखेड – संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. या सरकारने सर्वांना फसविले अन्‌ जगाचा पोशिंदा म्हणता, त्या शेतकऱ्यांना भीक मागायला या सरकारने लावले. शेतकऱ्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करण्याची वेळ या सरकारने आणली आहे, अशी टिका जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली.

शासनाच्या वतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाऊंडेशन, स्वाभिमान शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर नेला त्यावेळी पवार बोलत होते. खर्डा चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात प्रा.मधुकर राळेभात, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषीकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय वारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राळेभात म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. त्यामुळे सरकारची ही फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा. हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरु करण्याचे मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हमीभाव केंद्र तालुक्‍यात मंडलनिहाय सुरू करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लेखी पत्र मोर्चेकरांना दिले. सुमारे पाच तासानंतर हा मोर्चा संपला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)