जामखेडमधील दत्तनगर भागात भरदिवसा घरफोडी

जामखेड – शहरातील मराठी शाळेमागील दत्तनगर भागात भरवस्तीमध्ये सोमवार दुपारी दोनच्या सुमारास घरफोडी झाली.अडीच तोळे सोने व रोख 70 हजार रुपये असा ऐवज घेवून चोरटे पसार झाले. दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दत्तनगर भागातील रवींद्र दत्तात्रय परदेशी हे साडेबाराच्या सुमारास शहरात सोनारगल्ली भागात राहणारे आपले बंधू मुकुंद परदेशी यांच्या घराच्या वास्तूशांतीसाठी सहकुटुंब घराला कुलूप लावून गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी परदेशी यांच्या घराचे कुलूप तोडून बहिणीने हॉलमध्ये ठेवलेल्या पिशवीतील पर्समधून अडीच तोळे सोने, पाच हजार रोख व इतर कॉस्मेटिक साहित्य तर परदेशी यांच्या कपाटाची उचकापाचक करून त्यातील रोख 58 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले.

परदेशी हे वास्तूशांती उरकून घरी अडीच वाजता आल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून फेकून दिलेले निदर्शनास आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत जामखेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी श्‍वानपथक व ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून घरफोड्याचे सत्र सुरूच आहे. शहरातील स्टेट बॅंक परिसरातील झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाही. तोच पुन्हा भरदुपारी चोरी झाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
133 :thumbsup:
47 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)