जामखेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 15 लाख अग्रीम

जामखेड – जामखेड नगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांना दीपावली सणानिमित्त 12 हजार पाचशे रुपयांचे अग्रिम (ऍडव्हान्स) अनुदान रकम दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. यासाठी 15 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जामखेड नगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांनी दीपावली सणानिमित्त अग्रीम अनुदान रकम दीपावली सणापूर्वी मिळावी, अशी मागणी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे केली होती. या मागणीला घायतडक तात्काळ प्रतिसाद देत शासनानाकडून साहाय्यक अनुदानातून 15 लाख रुपयांचे अनुदान कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“जामखेड नगरपालिकेच्या 120 कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम प्रत्येकी 12 हजार पाचशे रुपये असे एकूण 15 लाखाची तरतूद करण्यात आली असून दोन दिवसामध्ये कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे वर्ग होतील.
-विशाल नाईकवाडे,प्रभारी मुख्याधिकारी

यामुळे नगरपालिकेच्या 120 कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रत्येकी 12 हजार पाचशे रुपये त्याच्या बॅंक खात्यात तात्काळ जमा होणार आहे. या निर्णयाने कामगार कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण पसरले आहे. कर्मचाऱ्यांना 12 हजार पाचशे रुपयांचे हे अग्रीम अनुदान एकमुखाने मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्ष निखिल घायतडक, प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे, कार्यालयीन अधीक्षक महेंद्र ताकपीरे, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)