जामखेड शहरातील अतिक्रमणांवर हातोडा

शहरातील खर्डा चौक ते अमरधाम या मार्गावरील 26 अतिक्रमणे काढण्यात आली.

जामखेड – शहरातील खर्डा चौक ते अमरधाम मार्गावरील बुधवारी (दि.10) रोजी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात व अतिक्रमण पथकाने तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणांवर हातोडा टाकला.

खर्डा चौक ते आमरधाम या रस्त्यावरील अतिक्रमण निघत असल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. रस्ता कामात अतिक्रमणांचा मोठा अडथळा येत होता. तो दूर करत मुख्याधिकारी नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या नगरपरिषद अंतर्गत सव्वा चार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे असलेल्या रस्त्याच्या कामास बांधकामाचा अडथळा ठरला. त्यामुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी नाईकवाडे यांनी सदर अतिक्रमणे काढण्यासाठी प्रारंभी खूणा करून करून दिल्या. नंतर न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले.

-Ads-

26 अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते. यावेळी अतिरिक्त बंदोबस्तात राज्य राखीव दलाची तुकडी, पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक 2 व 70 पोलीस कर्मचारी तैनात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)