आयटीआयकडे मुलींचाही कल वाढला : आभाळे

अकोल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण क्रेंदात शिक्षक दिन; शिक्षकाकडून विद्यार्थ्याला एक दिवसाचा पगार

अकोले – विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. सद्या मुली आयटीआयकडे वळत आहेत. कंपन्यांमध्येही त्यांना संधी आहे. मुलीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामात आघाडीवर आहेत. त्यामुळे या वर्षासह पुढील वर्षापासून मुलींना जास्तीत जास्त प्रवेशाची संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंत आभाळे यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते होते. या वेळी प्राचार्या मीना नवले, माजी प्राचार्य व्ही. बी. देशमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य व्ही. बी. देशमुख यांनी वसंत बापट यांचे तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून पिकल उद्याच रानं हे गीत गाऊन विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले. नवले यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी ध्येय कुशलतेने गाठावे, असे सांगितले.

संतोष हासे या शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांची भूमिका पार पडणाऱ्या श्रीकांत आरोटे यास एक दिवसाचा पगार बक्षीस म्हणून दिला. सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले. अक्षदा शिंदे, अमोल बेनके यांनी सूत्रसंचालन केले. आकाश बिन्नर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)