इंदोरी फाट्यावर आज ऊस व दूध परिषद

अकोले – नगर जिल्ह्यातील ऊस आणि दूध उत्पादकांना चांगला भाव मिळावा या मागणीसाठी व त्यातून शेतकऱ्यांना जागृती यावी यासाठी उद्या शुक्रवारी अकोले तालुक्‍यातील इंदोरी फाट्यावर साई लॉन्स येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस व दूध परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर ही परिषद होत आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामाचा ऊस दर उस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार पदरात पाडून घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पॅटर्न’ नगर जिल्ह्यात राबवण्यासाठी खा. शेट्टी कोणती घोषणा करणार याबाबत शेतकरी वर्गात औत्सुक्‍याची भावना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिषदेस खा.राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, राज्याध्यक्ष रविकांत तुपकर, महिलाध्यक्ष रसिका ढगे, युवाध्यक्ष हंसराज वडगुले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे राज्याध्यक्ष अमर हिप्परगे, युवती अध्यक्ष पूजा मोरे, विद्यार्थी परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष शर्मिला येवले आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)