वसतिगृहातील आहार प्रकरणी गंभीर ताशेरे

चौकशी समितीने प्रादेशिक आयुक्तांना सादर केला अहवाल ठेकेदारावर कारवाईचे संकेत

कर्जत – गायकरवाडी तसेच कर्जत येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत नसल्याच्या प्रश्नावर कर्जत आरपीआयतर्फे आवाज उठविण्यात आला. सलग दोन दिवस आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला. तक्रारीतील तथ्य शोधण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालात गंभीर बाबी उघड झाल्या असून तसा अहवाल नाशिकच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयात सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आरपीआयने ठिय्या आंदोलन, भिक मांगो आंदोलन, डफडे बजावो आंदोलन केले. दरम्यान कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांचे समवेत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. या मुद्यावर चौकशी समिती नेमण्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानुसार समितीने या प्रकाराची सखोल चौकशी केली. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले.

आहार वेळेवर न मिळणे, आहारात अळ्या आढळणे अशा सर्व तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल नगरचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी नाशिक येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयास दिला आहे. या अहवालात संबंधीत ठेकेदार यांचेवर कारवाई करण्याचे सूचित केले आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे यांनाही यासंदर्भात कळविण्यात आले.

कारवाईचे पत्र मिळाल्याने जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे गायकरवाडी येथील निवासी शाळेत जाहीर करण्यात आले. कर्जत नगरपंचायतीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, वृध्द भूमिहीन शेतमजूर संघटनेने अध्यक्ष शब्बीर पठाण, नगरसेवक वृषाली पाटील, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, जिल्हाकार्याध्यक्ष भास्कर भैलुमे आदी मान्यवर व आरपीआयचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)