हर्षवर्धन कोतकर स्वगृही परतण्याच्या वाटेवर

केडगावमधून कॉंग्रेसकडून निवडणूक लढण्याच्या विचारात

नगर – कॉंग्रेसचे माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याचा पुतण्या हर्षवर्धन कोतकर शिवसेनेला रामराम करून स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहे. त्या दृष्टीने हालचाली झाल्या असून हर्षवर्धन केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 16 मधून कॉंग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्‍यता त्यामुळे निर्माण झाली आहे.

भानुदास कोतकर याच्यातील कौटुंबिक वादातून हर्षवर्धन यांच्या कुटुंबाने भानुदास याच्याशी संबंध तोडून कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. गेल्या वर्षभरापासून हर्षवर्धन हे शिवसेनेचे काम करीत होते. केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 32 ची पोटनिवडणुकीत हर्षवर्धन त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.

एप्रिल 2018 मध्ये ही निवडणूक झाली होती. तेव्हापासून हर्षवर्धन शिवसेनेत सक्रिया काम करीत होते. परंतू आता महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार याबाबत शंका व्यक्‍त होत होती. ज्या प्रभागात हर्षवर्धन उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्याच प्रमाणात दुहेरी हत्याकांडात मरण पावलेल्या संजय कोतकर यांच्या मुलगा संग्राम याला उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे हर्षवर्धन नाराज झाले आहे.

त्याबरोबर कोतकर कुटुंबातील वाद देखील मिटविण्याच्या हालचाली त्याच दरम्यान सुरू झाल्या. मध्यतंरी हर्षवर्धन याचे वडील व कोतकर याच्यात वाद संपुष्ठात आणण्याचा प्रयत्न झाला. त्यानुसार हा वाद संपुष्ठात आला असल्याचे समजते. त्यातून हर्षवर्धन त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये सक्रिया होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

सध्या भानुदास कोतकर याच्यासह त्याचे तिन्ही मुले शिक्षा भोगत आहे. दुहेरी हत्याकांडानंतर माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे केडगावमध्ये कॉंग्रेसचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत हर्षवर्धन हे पक्षाला सावरू शकतील. त्यामुळे त्यांच्याकडे केडगाव कॉंग्रेसची धुरा देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

अर्थात महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून हर्षवर्धन कोतकर हे शिवसेनेच्या कोणत्याही व्यासपीठावर दिसले नाही. ते शिवसेनेपासून दूर राहत असल्याचे सांगण्यात आले. त्यात त्यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने कोतकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यात कोतकर कुटुंबातील वाद देखील संपुष्ठात येण्याची चिन्हे दिसून आल्याने हर्षवर्धन यांनी शिवसेनेला रामराम ठोकून पुन्हा कॉंग्रेसचे काम करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते कॉंग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)