अखिल गुरव समाजासाठी अॅट्रासिटीसारखा कायदा करा

नगर  – देवस्थान इनाम वर्ग फेर सर्व्हे करून बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी ताब्यात देणे व त्यांच्या नावे जमिनीचे हस्तांतरण करावे. सात बाराचा उतारा त्यांच्या नावावर लावावे. महाराष्ट्रातील सर्व देवस्थान ट्रस्टीमध्ये 50 टक्के गुरवांना विश्‍वस्त व पदाधिकारी म्हणून घ्यावे. गुरव समाजाच्या देवस्थान पूजेचा धार्मिक विधींचा हक्क कायम ठेवावा, तसेच शैक्षणिक, मागासलेपणा दूर करण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद या प्रमुख ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी विद्यार्थी वसतिगृहासाठी प्लॉट उपलब्ध करून द्यावेत.अशा मागण्यांचे निवेदन गुरव समाजाच्या वतीने देण्यात आले.

क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी, शेतीविषयक कर्ज उपलब्ध करून देणे, आथिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना मदत करणे, ओबीसी निधी वाटप हे जातीनिहाय व्हावे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय व विकासनिधी वाढवावा, गुरव समाजावर दिवसेदिवस हल्ले वाढत असून, गावामध्ये 3-4 घरेच असल्याने शेती व उत्पन्नावर गावकरी त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी अॅट्रासिटी ऍक्‍टसारखा समान कायदा अस्तित्त्वात आणावा या व आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा विचार न झाल्यास डिसेंबरमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा गुरव समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिल गुरव समाजाच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी मागील महिन्यात गुरव समाजाच्या वतीने नगरमध्ये राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील विविध चर्चा होऊन गुरव समाजाला येणाऱ्या अडचणीसंदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे बैठकीत ठरले.

यानुसार नगर येथे अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले. यावेळी महिला राज्य अध्यक्ष सुरेखा तोडमल, मानद अध्यक्ष वसंतराव बंदावणे, उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक पांडे, सरचिटणीस उत्तर संजय घोडके, जिल्हाध्यक्ष अनिल तोरडमल, जिल्हाध्यक्ष महेश शिर्के, दत्तात्रय मल्लनाथ, अशोक शिंदे, गणेश शेलार, कार्याध्यक्ष सुरेश थोरात, सुधाकर शिंदे, अरविंद आचार्य, सुनील पवार, विनायक धुमाळ, बाळासाहेब शिंदे, शंकर शिंदे, रामनाथ गुरव, शिवप्रसाद गुरव, संतोष केदारी, राजेंद्र धुमाळ, उमेश शिर्के आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)