प्रभात प्रभाव : खडबडून जागे झालेल्या पोलिसांकडून आरोपींवर गुन्हे
गोपाळपूर – नेवासे तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट या मथाळ्याखाली 18 नोव्हेंबरच्या दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या नेवासा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली वरखेड येथे अवैध देशी दारू विक्रीवर कारवाई केली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले की, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वरखेडमध्ये घराच्या आडोशाला महादेव साहेबराव गायकवाड (वय-19, रा.वरखेड) हा विना परवाना बॉंबी संत्रा कंपनीच्या देशी दारु विकतांनी आढळून आला.
त्याच्याकडे 572 रूपये किंमतीच्या बॉंबी संत्रा कंपनीच्या 11 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. नेवासा पोलीस ठाण्यात महादेव सखाराम गायकवाड याच्यावर 741/18 मुपोकॉं 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक यादव हे करत आहे.
“तालुक्यामध्ये अवैध धंद्यावर आम्ही कारवाई करत असून तालुक्यातील सलबतपूर, गोंडेगाव बरोबरच वरखेड या ठिकाणी अवैध दारूवर कारवाई केली असून, रामडोह येथेही अवैध धंद्यावर कारवाईसाठी गेलो होतो, त्या ठिकाणी काही मिळून आले नाही. यापुढेही अवैध धंद्याबाबत कारवाई केली जाईल.
-रणजित डेरे (पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस ठाणे.)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा