गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वर्षांपासून बंद

-सचिन दसपुते

गोपाळपूर, दि. 22 – नेवासा तालुक्‍यातील गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील 20 गावांचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे. ही पाणी पुरवठा योजना गळनिंब, गोगलगाव, जळके, खेडले काजळी, सलाबतपूर, दिघी, गिडेगाव, शिरसगाव, गोपाळपूर, धनगरवाडी, खामगाव अशा 20 गावांसाठी अस्तित्वात आहे. या गावांची तहान ही योजना भागवते. परंतु गेल्या एक ते दीड वर्षांपासून ही योजना बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या गावातील एक लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद ठेकेदारामार्फत चालवते. सुमारे 25 वर्षापूर्वी या योजनेचे काम झाले आहे. बागायती भागातून काळी कसदार जमीनीमधून पाईपलाईन गेलेली असल्याने याला गंज चढवून ते लिकेज होत आहे. यामुळे ही योजना बंद पडते. तसेच जुनाट पंप व इतर साहित्यामुळे योजनेला साडेसाती लागली आहे.

“वर्षापासून गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गळनिंब, सलबतपूर सह 20 गावांच्या पाण्याचा प्रश्न एकदम बिकट झाला आहे. गावातील विहिरी व बोरवेल कोरडे पडले आहे. यामुळे सध्या टॅंकरने पाणी सुरू करणे आवश्‍यक आहे. गावातील महिलांना रोजंदारीचे काम सोडून दिवसभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे ही योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
– मंगेश निकम, सलाबतपूर

योजनेचे पाणी मिळणार म्हटले तर प्रत्येक नागरिकांना ग्रामपंचतीला पाणीपट्टी भरावी लागते. परंतु बहुतेक वेळा योजना बंद पडत असल्याने नागरिकांना सुरळीत पाणी मिळत नाही, म्हणून पट्टी भरण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे वसूली होत नसल्याने बहुतेक वेळेस या योजनेचे बिल थकल्याने महावितरण लाईट बंद करते.

“गळनिंब पाणी योजना बंद असल्याने पाण्याची अडचण भासत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना दूर अंतरावर जावे लागते. ग्रामस्थांनी पाण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले, हंडा मोर्चा काढला तरी दखल घेतली नाही.
– संदीप वाघ, सलाबतपूर

मागील दोन वर्षापासून या ना त्या कारणाने बंद असलेली योजना एक वर्षापासून कायमच बंद आहे. यामुळे वर्षापासून गळनिंब सह 20 गावामध्ये पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालवत चालली आहे. यामुळे बोरवेलचे पाणी कमी पडू लागले आहेत.

तसेच पिण्यासाठी जास्त दराने पाणी खरेदी करावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. हक्काचे पाणी या योजनेतून मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच या गावासाठी पाणी प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे उन्हाळामध्ये पाण्याबाबत मोठे संकट उभे राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)