चाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात

भाव नसल्यामुळे दुष्काळात अडचणीत पडत आहे भर


-सचिन दसपुते

गोपाळपूर  – गेल्यावर्षी नेवासा तालुक्‍यातील जायकवाडीच्या बॅकवॉटर परिसरामध्ये उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच चाळीत साठवून ठेवला. मात्र आता तो कांदा आता चाळीत सडू लागला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास देखील गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जायकवाडी परिसरात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, कांद्यासाठी चांगले हवामान, कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळवून देणारे पिक म्हणून या परिसरातील शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. गेल्यावर्षी उन्हाळी कांदा. त्यानंतर लाल कांद्याचे चांगले उत्पादन झाले. कांदा काढली वेळी चांगला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा शेडमध्ये चाळीत साठवून ठेवला.

सात ते आठ महिने टिकणारा कांदा वर्षभर भाव न मिळाल्याने चाळीमध्ये सडत पडला. आता हा कांदा पुन्हा शेतामध्ये गाडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा विकून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना हा कांदा उपयोगी आला असता, परंतू भावच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमाला बाबात शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्‍त केली आहे.शासनाने या सडलेल्या कांद्याचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहेत.

चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी ही मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड केली आहे. गेल्या वर्षीच्या कांद्याला चांगला दर न मिळाल्याने उत्पादन खर्च तर नाही परंतू व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन केले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाने स्वतः ला सावरून कांदा लागवड केली आहे. परंतू, यावर्षी कांद्याला चांगला दर मिळाला नाही तर शेतकरी पूर्ण पणे मोडकळीस येणार आहे. यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा, हीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

“शासनाने उन्हाळी कांद्यासाठी 200 रुपये अनुदान जाहीर केले असले तरी सध्या मागील वर्षीचा उन्हाळी कांदा चाळीमध्ये सडला आहे. या कांद्याचा कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांने लाखो रुपये खर्च करून कांदा लागवड केली असून या कांद्याला तरी आता योग्य दर मिळावा.
-शंकरराव ढोकणे,कांदा उत्पादक शेतकरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)