वरखेडच्या सरपंचपदी वंदना कुंढारे बिनविरोध

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील वरखेड ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदी एकच अर्ज आल्याने वंदना अशोक कुंढारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरखेड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी असलेल्या जयश्री गोरे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. यावेळी हे पद रिक्त होते. नेवासे तहसीलदार यांनी रिक्त असलेल्या जागेसाठी मंडलधिकारी ए.जी. शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून निवड करून 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सरपंच पदाची जागा नामाप्र स्त्री राखीव असल्याने वंदना कुंढारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दुपारी 2 वाजता वंदना कुंढारे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

यावेळी दहा सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच छाया खरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुलकर्णी, जयश्री गोरे, विश्वनाथ शिंदे, सोनाली हारदे, सुनंदा गणगे, चंद्रभान गणगे, मिराबाई गणगे, शेषराव शिरसाठ हे ग्रामपंचायत सदस्य तर, पंचायत समिती सदस्या सुषमा खरे, श्रीरंग हारदे, अशोक हारदे, संजय खरे, राजाबापू गोरे, भास्कर खरे, अण्णासाहेब गोरे, पोलीस पाटील संतोष घुंगासे, सुरेश घुंघासे, सुनील कुंढारे, रामेश्वर जाधव, किशोर राजगुरू, कैलास कुंढारे, अमोल कुंढारे, रामदास गोरे, मधुकर गोरे, शांताराम कुंढारे, धनंजय कुंढारे, नामदेव गणगे, शिवनाथ गणगे, शेषराव गणगे, कडूबाळ गणगे, संपत गणगे, सूर्यभान जगताप आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहायक म्हणून ग्रामसेवक रावसाहेब डौले व कामगार तलाठी पवार यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित सरपंच यांचे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तेजश्री लंघे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)