गळनिंब-शिरसगाव पाणी योजना दुष्काळात चालू होणार का ?

तालुक्‍यात पालकमंत्र्यांना प्रादेशिक नळ योजनेला निधी वापरता येणार


-सचिन दसपुते

गोपाळपूर  – तालुक्‍यातील सर्वात मोठी प्रादेशिक नळ योजना म्हणून गळनिंब-शिरसगाव पाणी योजना असून ही योजना 20 गावांसह 15 किलोमीटरपर्यंत विस्तारित झाली आहे. तालुक्‍यातील इतर नळ योजना या वर्षीच्या दुष्काळात चालू झाल्यानंतर भविष्यात या योजना सुरळीत होऊ शकतात, अन्यथा शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात जाणार हे नक्की असल्याचे चित्र दिसत आहे. गळनिंब-शिरसगाव पाणी योजना दुष्काळात चालू होणार का? असा प्रश्‍न परिसरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

दुष्काळजन्य तालुक्‍यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना प्रादेशिक नळ योजनेच्या वीज बिल दुरुस्ती व अन्य देखभालीसाठी दुष्काळ निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम देऊन गळनिंब-शिरसगाव नळ योजनेतील 20 गावाच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली तर ही योजना पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होणार आहे.

त्यामुळे या योजनेवर शासनाचा झालेला खर्च उपयोगी येणार असून सलायनवर असलेली ही नळ योजना जिवंत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी दुष्काळ निवारण निधीतून खर्च करावा अशीच मागणी येथील नागरिक करीत आहेत.

गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक नळ योजनेचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, तत्कालीन आमदार शंकरराव गडाख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अंतर्गत श्रेयावरून तीनतेरा वाजले आहेत. तसेच विद्यमान जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य बघ्यांची भूमिका घेत आहेत. येथील नागरिकांची नळ योजनेची पाणीपट्टी भरण्यास मानसिकता व गावातील गटांतटांचे राजकारणामुळे या योजनेला अखेरची घरघर लागली असल्याचे चित्र तालुक्‍यात बघायला मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)