नगर – गणेश उत्सव सण हा लोकमान्य टिळकांनी सुरू करून सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम केले आहे. देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.

गणेशोत्सवानिमित्त आशा टॉकीज चौकातील सरसेनापती तात्या टोपे प्रतिष्ठानने विद्युत रोषणाईतील परी मंदिर, बेटी पढाओ बेटी बढाओ व परी हूँ मैं या देखाव्याचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रणजित सुपेकर, अध्यक्ष सचिन गाडेकर, अभिजीत बोज्जा, महेंद्र बोज्जा, सुदाम आंदे, गणेश कोरडे, उमेश कोरडे, राजू दळवी, आकाश सुपेकर, प्रथमेश बोज्जा, अनिकेत आंदे, योगेश आंदे, प्रकाश घोलप, विनोद शेंदूरकर, प्रदीप बोज्जा, हनीफ शेख, फैरोज खान, हाजी मिर्झा, अजय बोडखे, मनोज सुपेकर, सय्यद जाकीर, साबीर खान, सय्यद शानू, विलास साठे, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)