परवानगीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची दमछाक

70 मंडळांना दिली परवानगी; शेवटचे चार दिवस बाकी

नगर – गणेशोत्सवासाठी परवानगी घेण्याची अट महापालिका प्रशासनाने घातल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची परवानगी घेण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. आजपर्यंत 70 मंडळांना परवानगी देण्यात आली असून 150 मंडळाचे अर्ज दाखल झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून कसून तपासणी करून परवानगी दिली जात असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना निकषानुसार मंडप उभारणी करावी लागत आहे.

महापालिकेने गणेशोत्सवातील परवानगीसाठी खास एक खिडकी योजना सुरू केली असून त्यामाध्यमातून परवानग्या दिल्या जात आहेत. गणेशोत्सवात मंडप उभारणीसाठी अर्ज दाखल करण्याची दि. 10 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत. परवानगी घेण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांची चांगलीच झुंबड उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने यंदा गणेश मंडळांची संख्या कमी राहण्याची चिन्हे आहेत.

येत्या 13 ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. तसेच गणेशोत्सव व मोहरम एकत्र आल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गणेशोत्सवास न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने प्रशासनाने घेतला आहे. परवानगी घेताना मंडळांना अटी घालून दिल्या आहेत.मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणी, संबंधित पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा, नगररचना विभाग, अग्निशामक दल, शहर अभियंता यांच्या ना हरकत दाखल्याची गरज आहे. त्यानंतर अंतिम परवानगी महापालिका अतिक्रमण विभागाकडून दिली जात आहे.

धर्मादाय आयुक्ताकडील नोंदणी वगळता इतर सर्व परवाने एक खिडकीतून दिले जात आहेत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच अनधिकृत मंडपावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंडळांनाकडून देखील परवानगी घेण्याचा प्रयत्न होत आहे. परवानगीसाठी महापालिकेमध्ये मंडळ पदाधिकाऱ्यांची रिघ लागली. मंडप उभारणीकरीता अर्ज दाखल करण्यास महापालिका प्रशासनाने दि.10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत आलेल्या अर्जांना दि. 12 पर्यंत परवानगी दिली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)