संतोष हरबा यांनी २२ हजार ५०० बटणांचा वापर करून सजविली गणेशमूर्ती

नगर – जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सोसायटीत श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा हे गणेशमूर्तीची आगळीवेगळी सजावट करून वेगळ्या रुपात मूर्ती सादर करतात. यंदा त्यांनी शर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या गुंडींचा (बटण) वापर करून साडेपाच फूटाची गणेशमूर्ती साकारली आहे. एक महिना मेहनत करीत त्यांनी तब्बल 22 हजार 500 रंगीबेरंगी बटणांचा वापर करीत मूर्ती सजवली आहे.गणपतीची अनोखी सेवा करण्यातून मोठे समाधान मिळत असल्याचे हरबा यांनी सांगितले.

विघ्नहर्त्या गणरायांची विविध रुपे प्रत्येकाला मोहित करीत असतात. कर्मचारी सोसायटीतील संतोष हरबा हे आपले दैनंदिन कामकाज सांभाळून महिनाभर आधीच गणपतीची तयारी करतात. मोठी मूर्ती निवडून ते मूर्तीला वेगळ्या पद्धतीने कल्पकतेने सजवतात.

गेल्या 17 वर्षांपासून ते वेगवेगळ्या सजावटीचे गणपती साकारत आहेत. यंदा त्यांच्या या उपक्रमाचे अठरावे वर्षे आहे. याआधी त्यांनी स्ट्रॉ, डिस्को मनी, थर्माकोल गोळी, कडधान्य, कुंदनचे खडे, खोबरा किस, गरम मसाला, चहा पावडर, काडेपेटीतील काड्या, चमकी, सुपारी, काचा, मोती अशा विविध वस्तूंपासून मूर्ती साकारल्या होत्या.

दरवर्षी वेगळेपणा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे यंदा त्यांनी बटणांचा वापर करून अतिशय सुंदर व मनमोहक गणेशमूर्ती साकारली आहे. या उपक्रमासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व संचालक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)