गणेशोत्सवात नगरकरांची ढोलपथकांनाच पसंती

हिंद सेवा मंडळाच्या प्रार्थमिक शाळेच्या बालचमुंचे झांज पथक ठरले आकर्षक

नगर – गणेशोत्सवाची सुरवात उत्साहात झाली असून आज सकाळपासुनच ढोल-ताश्‍यांच्या निनादात मिरवणुका निघाल्या. यंदाच्या उत्सवात सी डी ,डिजेचे अस्तित्वच नामषेश झाल्याचे चित्र पहायला मिळाले. शहर व उपनगरात ढोलपथकांचीच चलती असल्याचे पहायला मिळाले.

शहर व उपनगरात जवळपास 109 ढोलपथके असून रुद्रनाद, रुद्रवंश ,पद्मनादम, हिंदवी शौर्य आदी पथकांचा समावेश असून या ढोलपथकांमध्ये युवक युवती मोठ्यापर्माणात सहभागी आहेत तर काहि पथकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. प्रत्येक पथकात किमान 60 ते 250 वादकांचा सहभाग आहे.

गेल्या महिनाभरापासून या ढोलपथकांचा निरनिराळ्या ठिकाणी सराव सुरू होता.यापथकांमध्ये नाशिक ढोलसह अन्य सर्व तालही वाजविले जात असल्याने या ढोलपथकांना नगरकरांकडुन पसंती मिळत आहे. या व्यतिरीक्‍त विविध शाळांनीही आपली ढोल ,झांज, लेझिम पथके तयार केली असून या पथकांनाही चांगली मागणी आहे.

बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या गणेशाच्या स्थापना मिरवणुुकीत बालचमूंच्या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. शाळेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम, उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी यानिमित्त गांधी मैदान येथून श्रीगणेशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचे झांज पथक मुख्य आकर्षण ठरले.

तालबद्ध वादन व विविध डाव करत या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधाले. या मिरवणुकीत शाळेतील शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठीकठिकाणी या झांज पथकाचे सादरीकरण पाहण्यास गर्दी होत होती. बालचमुंच्या या आकर्षक झांज पथकाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी मार्गदर्शन केले तर मुदस्सीर पठाण, संदीप कळसकर आदींसह शिक्षकांनी यशस्वीते साठी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)