गणपतीच्या आगमनाने पाऊस सुरु व्हावा

खा.गांधींची प्रार्थना : ढोल पथकाच्या ठेक्‍यावर अर्बन बॅंकेच्या गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

नगर -श्री गणेशाच्या शुभ आगमनाने व आशिर्वादाने देशाचा, महाराष्ट्राचा व नगर शहराचा विकास होणार आहे. सर्वत्र उत्साहवर्धक व प्रसन्न वातावरण झाले आहे. अर्बन बॅंक परिवारही या गणेशोत्सवात उत्साहात सहभागी झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावस लांबला आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. श्रीगणेशाच्या आगमनाने हे दुष्काळाचे सावट दूर व्हावे व सर्वत्र धो-धो पाऊस पडवा, अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी खासदार दिलीप गांधी यांनी केली.

शतक महोत्सव पार पाडून 108 वर्षात पदार्पण केलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट बॅंकेच्या गणेशोत्सवास सकाळच्या मंगलमय प्रसन्न वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला यावेळी वरूण राजानेही रिमझिम पावसाचा शिडकावा केला . दिल्लीगेट येथील बॅंकेच्या चौपाटी कारंजा शाखेपासून निघालेल्या शिस्तबद्ध मिरवणुकीत सजवलेल्या रथामधून श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. तर पालखीमध्ये छोटे श्रीगणेश होते. नगरमधील प्रसिद्ध तालयोगी ढोल पथकाच्या ठेक्‍यावर ही मिरवणुक मार्गस्थ होत होती.

मिरवणुकीच्या प्रारंभी सनई चौघाडा वाजत होता. भालदार-चोपदार, मावळे, पुजारींचे वेषभुशा केलेले कर्मचारी यावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बॅंकेचे अध्यक्ष खा.दिलीप गांधी हे स्वत: श्रीगणेशाच्या पालखीचे भोई झाले होते. यावेळी उपाध्यक्ष नवनीन सुरपुरिया, संचालक विजय मंडलेचा, किशोर बोरा, अजय बोरा, शैलेश मुनोत, मनेष साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी, प्रमुख व्यवस्थापक सतीश शिंगटे, सहप्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, महादेव सावळे, मुख्य शाखाधिकारी हेमंत बल्लाळ, प्रविण सांगळे आदिंसह बॅंकेचे कर्मचारी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. बॅंकेचे महिला व पुरुष कर्मचारी विवीध प्रबोधनात्मक फलक हातात घेऊन सहभागी झाले होते.

तालयोगी ढोल पथकाच्या ठेक्‍यावर ही मिरवणुक दिल्लीगेट, चितळरोड, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक मार्गे ही मिरवणुक अर्बन बॅंकेच्या मुख्य कार्यालयात पोहचली. या ठिकाणी बॅंकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया व मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांच्या शुभहस्ते षङोपचाराने विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.10 दिवस गणेशोत्सवानिमित्त बॅंकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)