सामाजिक उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न

मोरया प्रतिष्ठान, के.के. बुधराणी हाॅस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र शिबिराचे उद्घाटन करताना जि.प. अति कार्यकारी अधिकारी भोर.

भोर : गणेशोत्सवानिमित्त मोरया प्रतिष्ठानतर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

नगर – गणेशोत्सवामध्ये अनावश्‍यक खर्चास फाटा देवून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, अशा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोरया प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छ भारत अभियान, मुली वाचवा, मुली शिकवा, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया अशा समाजोपयोगी स्त्युत्य उपक्रमांचे आयोजन करुन समाजाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले.

-Ads-

मोरया प्रतिष्ठान व मोरया मॉर्निंग ग्रुप तसेच के.के.बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उद्‌घाटन भोर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक गौरव फिरोदिया, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मनपा सभागृहनेते गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पत्रकार बाळ बोठे, सीए राजेंद्र काळे, भाजपचे नेते अभय आगरकर आदी उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. किरण वराळे यांनी उपक्रमांची माहिती दिली. प्रतिष्ठानचे सातवे वर्ष असून, दरवर्षी गणशोत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.सर्व समाजामध्ये स्वच्छते बाबत, मुली वाचवा, मुली शिकवा यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.

स्वच्छतेची देशाला अतिशय गरज असून, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी निश्चितच या अभियानाचा आपणास फायदा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. त्यात 230 गरजू नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली व त्यातील 30 जणांवर पुणे येथे अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)