आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आजपासून

नगर कॉलेजमध्ये उद्‌घाटन; शांतिकुमार फिरोदिया फौंडेशनचा उपक्रम

नगर – तिसऱ्या फिरोदिया-शिवाजीयन्स्‌ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उद्या (गुरुवार) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर प्रारंभ होणार आहे. उद्या सकाळी दहा वाजता प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे.

शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचा हा एक उपक्रम आहे. नगर जिल्हा फुटबॉल संघटने (एडीएफए) च्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन मॅक्‍सिमस स्पोर्टस्‌ ऍकॅडमी आणि पुण्याच्या शिवाजीयन्स स्पोर्टस्‌ क्‍लबच्या वतीने करण्यात आले आहे. मॅक्‍सिमस स्पोर्टस्‌ ऍकॅडमीचे मुख्य विश्‍वस्त नरेंद्र फिरोदिया या स्पर्धेबाबत म्हणाले, की नगर जिल्ह्यातील मुलांना आपले गुणकौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. ही स्पर्धा 12, 14 आणि 16 वर्षांखालील मुलांसाठी होणार आहे.

मुलींसाठी वेगळा गट तयार करण्यात आला असून त्यांच्याही स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना फिरती ढाल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. याबरोबरच वैयक्‍तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
शिवाजीयन्स्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर म्हणाले, की विविध वयोगटातील मुलांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठीही या स्पर्धेचा उपयोग होणार आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील 24 मुलांची निवड करून त्यांना शिवाजीयन्स क्‍लबमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पुण्यातील डीएसके शिवाजीयन्स्‌ आंतरराष्ट्रीय ऍकॅडमीमधील तीन दिवसीय प्रशिक्षणाचाही समावेश आहे.

“गेल्या वर्षी अनुप रमेश भगत या दहावीच्या विद्यार्थ्यांचा या प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. अनुपची निवड फिरोदिया शिवाजीयन्स्‌ प्रशिक्षण शिबिरातून करण्यात आली होती. अनुपला पुण्यातील डीएसके शिवाजीयन्स्‌ आंतरराष्ट्रीय ऍकॅडमीमध्येही प्रशिक्षण देण्यात आले होते. या धर्तीवर आणखीही अनेक खेळाडू या प्रशिक्षणातून तयार होतील. फिरोदिया यांच्या पुढाकारामुळेच सर्वच स्तरातील खेळाडूंना अशी संधी प्राप्त होऊ शकणार आहे,” असे वाळवेकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)