सरबत, प्रसादासाठी मंडळांना नोंदणी बंधनकारक

अन्न व औषध प्रशासनाची माहिती; दर्जा कमी प्रतीचा आढळल्यास कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा

प्रदीप पेंढारे

नगर – मोहरम आणि गणेश उत्सवाच्या काळात सरबत आणि खाद्यपदार्थांचे प्रसाद म्हणून मोठ्याप्रमाणात वाटप होते. प्रसाद म्हणून या पदार्थांचा दर्जा अतिउच्च असला पाहिजे हे अन्न व औषध अधिनियम 2006 सांगतो. मंडळांना यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे निर्बंधनकारक आहे, अशी माहिती सहायक आयुक्त किशोर गोरे व बालू ठाकूर (अन्न) यांनी “प्रभात’शी बोलताना दिली. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत मंडळांना आणि यंग पार्ट्यांना ही माहिती अन्न व औषध प्रशासनाला देणे सोपे झाले असते. परंतु जिल्हा प्रशासनाकडून या बैठकीची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

नगर शहरात मोहरम मोठ्याप्रमाणात साजरा होतो. मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून सरबताचे वाटप होते. या सरबताच्या वाटपाची जबाबदारी संबंधित यंग पार्ट्या आणि मोहरम उत्सव समितीवर असते. त्यासाठी यंग पार्ट्या आणि मोहरम समितीने सरबत वाटपासाठीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सरबत आणि त्यातील बर्फाचा दर्जा हा उच्चच असला पाहिजे. सरबतातील बर्फ हा खाणेजोगे असला पाहिजे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सुमारे आठ ते दहा हजार मंडळांकडून गणेश उत्सव साजरा केला जातो. बहुतांशी गणेश मंडळांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप होते. या प्रसादाचा दर्जा देखील चांगल्या प्रतिचा ठेवणे मंडळांना बंधनकारक आहे. प्रसाद ठेवण्याची जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे. प्रसाद बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे चांगल्या प्रतिचे असणे देखील बंधनकारक आहे.

सण-उत्सवाच्या काळात यंग पार्ट्या आणि मंडळांचा उत्साह खूपच असतो. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यात प्रसाद म्हणून खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते. या उत्साहाच्या भरात अन्न व औषध अधिनियमाचे पालन होणे गरजेचे आहे. मंडळांना खाद्यपदार्थाच्या वाटपासाठी शंभर रुपयांत परवाना मिळतो. तो असणे आवश्‍यक आहे. नोंदणी असो किंवा नसो मंडळांकडून किंवा यंग पार्ट्यांकडून कमी प्रतिचे खाद्यपदार्थांचे वाटप झाल्याचे आढळल्यास एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याचबरोबर नोंदणी नसल्यास आणि खाद्यपदार्थांचा दर्जा कमी आढळल्यास दंडाबरोबर फौजदारी कारवाईला देखील संबंधितांना समोरे जावे लागू शकते.
किशोर गोरे, सहायक आयुक्त (अन्न)

अन्न व औषध अधिनियमानुसार यासाठी मंडळांची आणि यंगपार्ट्यांची अन्न व औषध प्रशासनकडे नोंदणी आवश्‍यक आहे. नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. यासाठीचे नोंदणी शुल्क हे शंभर रुपये आहे. परवाना नसलेल्याबाबत तक्रार आल्यास त्याविरोधात फौजदारी कारवाई होऊ शकते. सण-उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांची मोठ्याप्रमाणात रेलचेल असते. या खाद्यपदार्थांचा दर्जा देखील उच्चप्रतिचा असणे बंधनकारक आहे. विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थांची या काळात तपासणी होते. गेल्यावर्षी देखील ही तपासणी झाली होती. अन्न व औषध प्रशासनाला मनुष्यबळाअभावी या काळात फक्त 40 नमुने तपासता आले. या काळात ज्यापद्धतीने तपासणी होणे गरजेचे आहे, तशी झाली नाही. जिल्ह्याच्या आवाका पाहता अन्न व औषध प्रशासनाची ही मोहिम खूपच तोडगी ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)