कर्जास कंटाळून चिंचोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या

राहुरी – तालुक्‍यातील चिंचोली येथील शेतकरी जालिंदर विठ्ठल लाटे (वय 55) यांनी आपल्या घराच्या गच्चीवरून खाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. बॅंक व खासगी सावकाराच्या कर्जाने हतबल झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी की, चिंचोली फाट्याजवळ चिंचोली-देवळाली रस्त्यालगत लाटे यांची वस्ती आहे. नुकतेच त्यांनी नवीन घर बांधले असून, तेथे ते रहावयास गेले आहेत. बुधवारी (दि.31) सायंकाळी 7 वाजण्याचे सुमारास ते चिंचोली फाट्यावरून घरी आले. त्यानंतर ते घराच्या गच्चीवर गेले. तेथून त्यांनी खाली उडी घेतली. त्यात त्यांच्या डोक्‍यास जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मयत लाटे यांच्यावर कॉर्पोरेशन बॅंकेचे सहा लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळते. शेतीसुधारणासाठी घेतलेल्या या कर्जाचा एकही हप्ता अद्याप त्यांच्याकडून गेलेला नाही. सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती त्यामुळे हातातोंडाची मुश्‍कीलीने गाठ पडत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. लाटे यांच्या पश्‍चात पत्नी, चार विवाहिती मुली, एक मुलगा असा परिवार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)