संग्रहित छायाचित्र

टाकळीभान परिसरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन : हुमणीचा प्रादूर्भाव वाढला

टाकळीभान  – श्रीरामपूर तालुक्‍यातील टाकळीभान परिसरात उसावर हुमणी अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शेतकऱ्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, उसाच्या पिकाला हुमणीपासून (उन्नी) मोठा धोका आहे. हुमणीने शेतकरी हादरून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत शेतकऱ्याने एकरी सुमारे 40 ते 45 हजार रुपये खर्च केला. आज ऊस 18 ते 20 कांडीवर आहे. पिकांची पूर्ण मशागत झालेली असल्याने कुठल्याही प्रकारच्या औषधाचा वापर करता येईना. हुमणी अळीने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने नुकसान भरपाई द्यावी व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कामगार तलाठी यांना द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन देण्यात आले आहे.

बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष बापूराव त्रिभुवन, कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, ग्रामपंचायत सदस्य कान्होबा खंडागळे, दादासाहेब कोकणे, शिवाजी धुमाळ, श्रीरामपूर तालुका दुष्काळ निवारण समिती अध्यक्ष श्रीकृष्ण वेताळ आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)