दुष्काळाने फळबागेचा प्रश्‍न गंभीर; शेतकरी चिंतातूर, लाखोंचा खर्च वाया

टाकळी खातगाव - पाण्याअभावी परिसरातील फळबागा जळून चालल्या आहेत.

टाकळी खातगाव – दुष्काळामुळे टाकळी खातगाव परिसरातील फळबागा आता जळु लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. फळबागा लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करून, खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील विहीरींनी तळ गाठला असून, शेतकरी परिसरातून टॅंकरव्दारे फळपिकांसाठी पाणी विकत आणत होते, तेथील पाणी संपल्यामुळे पाणी मिळत नाही.

शेतकऱ्यांसमोर फळबागा व जनावरे जगविण्यासाठी संकट उभे ठाकले आहे. जनावरांसाठी शेतकऱ्यांकडे सात ते आठ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे.

-Ads-

चारा नसल्याने गाईचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शासनाकडून जनावरांच्या चाऱ्यासाठी व फळबागा जगविण्यासाठी काही लवकरात लवकर मदत मिळेल काय? या विषयावर शेतकरीवर्गात कुजबूज चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)