राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ 

नगर – राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे त्यामुळे आज सावेडी उपनगरात राष्ट्रीय पोषण आहार जनजागृतीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी 2 च्या वतीने व साई संघर्ष महिला बचत गटच्या सहकार्याने लहान मुलासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाल्या त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

या पोषण महिन्यात अहमदनगर मध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत त्यामध्ये आज लहान मुलाचा पोषण आहार यावर असंख्य लहान मुलांनी पोषण आहार,फळाचा , भाजीपाल्याचा पोषाख घालून सहभाग घेतला
कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे,साई संघर्ष प्रतिष्ठानचे सुनील भाऊ त्र्यंबके,परिवेक्षिका तबसुल शेख,,योगेश पिंपळे,नगरसेविका रुपाली वारे, नगरसेवक महेश तवले, मंदा हंडे , शितल गुड्डा,मुख्य सेविका तबस्सुम शेख, कांबळे सिस्टर,आशा वर्कर अप्सरा शेख,मीना नाटक, अर्चना चवलवाड, आझरा शेख, साधना जवळकर आदी अंगणवाडी सेविका,मदतनीस,परिसरातील महिला,पुरुष, विद्यार्थी यावेळी उपस्तीत होते.

-Ads-

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर मान्यवरांचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. मनोगतानंतर लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये परिसरातील लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने भाग घेतला होता. स्पर्धेनंतर लगेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते लगेच बक्षीस वाटप करण्यात आले. प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे यांनी झालेल्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

सुनील भाऊ त्र्यंबके यांनी देखील या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचे व महिलांचे कौतुक केले तसेच असे हे कार्यक्रम नेहमी घेण्यात यावेत अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुलांचे वजन घेण्यासाठी लागणारे जे वजन काटे असतात ते 5 वजनकाटे देखील देण्याचे यावेळी त्यानी कबूल केले. रुपाली वारे यांनी देखील या कार्यक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांचे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कौतुक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)