अद्यापही राजकीय पक्षांचे झेंडे, फलक ‘जैसे थे’च

महापालिकेचा अतिक्रमण विभाग सुस्त

नगर – महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गुरुवारीपासून महापालिका हद्दीत निवडणूक आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने तातडीने राजकीय पक्षाचे फलक व झेंडे काढणे आवश्‍यक आहे. परंतू महापालिकेचा अतिक्रमण विभाग सुस्तावल्याने शहरातील राजकीय पक्षाचे फलक व झेंडे जैसे थेच असल्याचे दिसून आले आहे.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर गेल्या महिन्याभरात सर्व राजकीय पक्षांचे विविध कार्यक्रम व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व खा.सुप्रिया सुळे यांचे शहरात मेळावे झाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे शहरात विविध कार्यक्रम झाले.

त्यानंतर कॉंग्रेसची संषर्घ यात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेळावा झाला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शहरात मेळावा झाला होता. या चारही प्रमुख पक्षाच्या नेते शहरात येवून गेले. त्यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर पक्षाचे झेंडे व नेत्यांचे फलक उभारण्यात आले होते. आजही ते जैसेथे आहेत.

गुरुवारी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाचले. निवडणूक कार्यक्रम जाहीर होवून आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षाचे फलक व झेंडे काढणे आवश्‍यक आहे. मात्र अद्यापपर्यंत महापालिका प्रशासनाने झेंडे व फलकांना हात लावले नाही. फलक व झेंडे काढण्यात आले नाहीत. विशेषतः रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांना हे फलक व झेंडे लावण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)