नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी 40, तर कॉंग्रेस 22 जागा

आघाडीवर शिक्‍कामोर्तब; कम्युनिस्ट व रिपाईला प्रत्येकी 3 जागा


 जातीयवादी शक्‍तींना सत्तेपासून दूर करण्यासाठी आघाडी

नगर – गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा घोळ अखेर आज मिटल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीवर शिक्‍कामोर्तब झाले. महापालिकेच्या 68 जागापैकी राष्ट्रवादी 40 तर कॉंग्रेस 22 जागा लढणार असून नव्याने आघाडीत सामिल झालेल्या कम्युनिस्ट व रिपाईं (गायकवाड गट) यांना प्रत्येकी 3 जागा देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी आमदार दादा कळमकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

जातीयवादी शक्‍तींना सत्तेपासून दूर करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली असून महापालिकेत आघाडीची सत्ता असतांनाही प्रलंबित कामे कामे करून नगरकरांना मूलभूत सुविधा देण्याचे काम करण्यात आले आहे.

त्यामुळे महापालिकेत आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा करून कळमकर म्हणाले, गेल्या महापालिका निवडणुकीत आघाडी झाली होती. त्यावेळी सत्तेसाठी अपक्षांची मदत घेण्यात आली. परंतू यंदा चार नगरसेवकांचा प्रभाग असल्यामुळे या मोठ्या प्रभागात अपक्ष निवडूण येण्याची शक्‍यता कमी आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा आघाडी झाली आहे.

आघाडीचा निर्णय झाल्यानंतर कॉंग्रेसने जागा वाटप करण्याची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांच्यावर टाकली होती. मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एकत्रितपणे जागा वाटपाची चर्चा करण्याचे विखेंना सांगितले होते. त्यानुसार जागा वाटप करण्यात आले आहे. असे कळमकर म्हणाले.

यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा या निवडणुकीशी संबंध नाही. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार जागा वाटप करण्यात आले आहे. या जागावाटपाच्यावेळी थोरात, तांबे यांच्याबरोबर सातत्याने चर्चा केली आहे. थोरात विखे यांच्या वादामुळे कॉंग्रेसची शहरात ताकद कमी झालेली नाही.

ज्यावेळी शिवसेनेचा आमदार होता. तेव्हा युतीमध्ये शिवसेनेला जास्त जागा देण्यात येत होत्या. कारण शिवसेनेचा आमदार आहे म्हणून आताही राष्ट्रवादीचा आमदार आहे. म्हणून त्यांना जास्त जागा देण्यात आल्या आहे. कॉंग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. सर्व नेते या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराला येणार आहेत.

शहरात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी बळकट

शहरात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट झाली आहे. राष्ट्रवादीचा आमदार असल्याने आज घरोघरी राष्ट्रवादीचे चिन्ह पोहोचले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा दिल्या आहेत. या जागा वाटपात कॉंग्रेसला 15 जागा मिळाल्या असत्या तरी ते मान्य केले असते. मत विभागणी टाळण्यासाठी व शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने कमी जागा घेतल्या असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

नवखा असलो तरी खेळीमेळीत चर्चा

महापालिका निवडणुकीत शहराची माहिती नसलेला व नवखा चेहरा म्हणून राष्ट्रवादीबरोबर चर्चा केली असली तरी राष्ट्रवादीकडून चांगलीच वागणूक देण्यात आली आहे. तीन वेळा जागा वाटपाची चर्चा झाली. त्यात पक्षाने 32 जागांची मागणी सुरूवातीला केली होती. परंतू शहरात राष्ट्रवादीची ताकद कॉंग्रेसपेक्षा मोठी आहे. प्रतिष्ठेसाठी जागांचा आग्रह करून संख्या वाढविण्यात मला रस नव्हता. आघाडीची सत्ता येणे महत्वाचे होते. त्यामुळे जास्त जागांचा आग्रह न धरता निवडून येणाऱ्या क्षमता लक्षात घेवून राष्ट्रवादीला जास्त जागा दिल्याचे डॉ. विखे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
44 :thumbsup:
6 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)