शिवसेनेची एकीकडे युतीची बोलणी अन्‌ दुसरीकडे उमेदवारी जाहीर

नगर महापालिका निवडणूक 2018 : शिवसेनेकडून 32 उमेदवारांची यादी जाहीर

पालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर उमेदवार जाहीर

पाडव्या दिवशी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी पालकमंत्र्यांबरोबर युतीबाबत चर्चा केली. पालकमंत्र्यांनी युतीला सकारात्मक प्रतिसाद दिली होता. या चर्चेनंतर अर्ध्यातासाने लगेच गाडे, सातपुते यांच्या स्वाक्षरीने शिवसेनेची पहिली 19 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

नगर  – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून आतापर्यंत 32 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिली 19 उमेदवारांची पाडव्याची दिवशी जाहीर केली तर दुसरी 13 उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली आहे.

यादीत विद्यमान 14 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, एकीकडे युतीची बोलणी सुरू असल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड सांगत असतांना दुसरीकडे मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे युतीबाबत प्रश्‍न चिन्ह उभे राहिले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली व दुसरी यादी राठोड, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. त्या शिवसेनेने प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांना प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय याच प्रभागातून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल झालेले चंद्रशेखर बोराटे, भाजपमधून शिवसेनेत आलेले दत्तात्रय कावरे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या यादीत प्रभाग क्रमांक 1 मधून दीपाली बारस्कर, प्रभाग क्रमांक 4 मधून योगिराज गाडे, प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या कलावती शेळके, प्रभाग क्रमांक 7 मधून अशोक बडे व कमल सप्रे, प्रभाग क्रमांक 8 मधून रोहिणी शेडगे, पुष्पा बोरुडे,प्रभाग क्रमांक 9 मधून सुरेश तिवारी, प्रभाग क्रमांक 13 मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, प्रभाग क्रमांक 14 मधून माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रभाग क्रमांक 15 मधून मनसेच्या सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, अनिल शिंदे, प्रभाग क्रमांक 16 व 17 मधून दिलीप सातपुते व मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शनिवारी दुपारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नव्या उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून चंद्रकांत बारस्कार, प्रभाग क्रमांक 2 मधून प्रियंका तवले, प्रभाग क्रमांक 6 मधून रवींद्र वाकळे, प्रभाग क्रमांक 7 मधून रिता भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग क्रमांक 8 सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग क्रमांक 12 मधून मंगल लोखंडे, प्रभाग क्रमांक 13 मधून संगीता बिज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग क्रमांक 14 मधून सुरेखा भोसले, रेखा भंडारी, प्रभाग क्रमांक 15 मधून परसराम गायकवाड यांचा समावेश आहे.

शिवसेनेने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली खरी पण दुसरीकडे भाजपबरोबर युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राठोड यांनी युती करण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने युतीची शक्‍य आता धुसर झाल्याचे दिसत आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारांची चाचणीच सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)