शक्‍तीप्रदर्शनाने भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरू

नगर - भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी इच्छुकांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

सायंकाळपर्यंत 8 प्रभागातून 117 जणांच्या मुलाखती

तर युतीबाबत विचार करू

भाजपने शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रस्ताव यापूर्वी दिला होता. युती व्हावी असे भाजपला वाटते. परंतू शिवसेनेलाच ते वाट नाही. त्यांनी बहुतांशी प्रभागातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता युती करायची असेल तर शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत खुलासा करावा मगच युतीबाबत विचार केला जाईल. असे ठाकूर म्हणाले.

नगर – महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज बंद खोल्यात घेतल्या. सायंकाळीपर्यंत 8 प्रभागातील 117 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून उद्या देखील या मुलाखतीचे सत्र सुरू राहणार आहे. यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करीत मोठे शक्‍तीप्रदर्शन केले. त्यामुळे टिळक रस्त्यावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.

टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी साडेअकरावाजल्यापासून मुलाखतींना प्रारंभ झाला. सकाळीपासून कार्यालयात इच्छुकांसह समर्थकांनी एकच गर्दी केली होती. पहिल्यांदा भाजपच्या मुलाखतीच्या प्रक्रियेला एवढी गर्दी झाली होती. आपलास उमेदवारी का द्यावी?, प्रभागात संपर्क किती आहे?, जातनिहाय समीकरणे काय आहे?, निवडून येण्याची क्षमता आहे का?, प्रभागात काय समस्या आहे?, प्रतिस्पर्धा उमेदवार कोण असेल?, निवडून येण्याचे गणित सांगा आदी प्रश्‍न विचारण्यात आले.

मुलगा काँग्रेसमध्ये, आई भाजपच्या दारी

इंटर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील दगडे यांच्या आई विद्या दगडे यांनी आज भाजपकडे मुलाखत दिली आहे. यावेळी स्वप्नील दगडे हे देखील उपस्थित होते. त्याबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश वामन यांनी यावेळी मुलाखत दिली.

यावेळी कोअर कमिटीचे सदस्य पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रभागनिहाय इच्छुकांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत खा. गांधी म्हणाले, भाजपच शहराच्या विकासाला चालणा देवून शकतो. शहरातील विकास कामे करण्याची भाजपमध्ये क्षमता आहे. हे कार्यकर्त्यांना पडल्याने अन्य पक्षांनी अनेकांनी पक्षप्रवेश करून भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

आज 117 जणांच्या मुलाखती झाल्या असून इच्छुकांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्याही मुलाखती घेण्यात येणार आहे. सुमारे 300 इच्छुकांच्या मुलाखती होण्याची शक्‍यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपकडे येण्याचा ओढा पाहता पक्षाची महापालिकेत सत्ता येणार हे आता सिद्ध झाले आहे. असे सुजितसिंह ठाकूर यांनी स्पष्ट केले.

पक्षाकडून सर्व्हे करण्यात आला आहे. परंतू उमेदवारी देतांना या सर्व्हेचा आधार घेतला जाणार आहे. प्रदेश भाजपने ही निवडणुक ज्या प्रमाणे गांभीर्याने घेतली आहे. तशी ती मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली आहे. त्यामुळे ते देखील लक्ष ठेवून आहेत. असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
10 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)