नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : हर्षवर्धन कोतकर यांचा शिवसेनेसोबतच ‘जय महाराष्ट्र’!

नगर : युवा सेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांच्याविषयी काही दिवसांपासून शिवसेना सोडणार अशा अफवा आहेत. या अफवाच असल्याचा दावा उपनेते अनिल राठोड यांनी केला. या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन कोतकर स्वतः उपस्थित होते. हर्षवर्धन कोतकर हे युवा आहे. शिवसेनेने त्यांच्यासाठी वेगळी संधी देणार आहे. ते शिवसेनेचेच आहेत आणि राहतील.

संजय कोतकर यांनी शिवसेनेसाठी बलिदान दिले आहे. त्याच्या पत्नी सुनीता या तेथून निवडणूक लढवित आहेत. त्यांसाठी हर्षवर्धन कोतकर हे निवडणूक लढविणार नाहीत. हा निर्णयही हर्षवर्धन कोतकर यांनी पक्षश्रेष्ठींवर बोलून दाखविला आहे. हर्षवर्धन यांच्या या त्यागाबद्दल त्यांना शिवसेना वेगळी संधी देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर यांनीही हर्षवर्धन कोतकर यांचे यावेळी कौतुक केले. हर्षवर्धन कोतकर यांनीही निवडणूक लढविणार नाही, असा खुलासा या पत्रकार परिषदेत केला.

कोतकर यांनी संवाद साधताना “जय महाराष्ट्र’, असे म्हणत सुरूवात केली. ते म्हणाले, ‘आपण शिवसेनेतच राहणार आहोत. केडगावमधील आठही जागा निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. पक्षश्रेष्ठींना या जागा जिंकून आणून दिलेला शब्द पाळणार आहोत.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)