चौक अन्‌ गल्लीबोळात पडला दिव्यांचा प्रकाश

नगरसेवकांसह इच्छुकांनी बसविले स्वखर्चातून दिवे

वीजबिल महापालिकेच्या माथी

शहरात अनेक भागात मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी पथदिव्यांची दुरुस्ती, नव्याने दिवे बसविले आहे. अर्थात या दिव्यांची महापालिका दप्तरी कोणतीही नोंद नाही. परंतू महापालिकेच्या विद्युत तारेवर कनेक्‍शन घेवून हे नव्याने दिवे बसविण्यात आले आहे. परिणामी या कामांचा खर्च महापालिका देणार नसली तरी या दिव्यांचे वीजबिल मात्र यापुढे महापालिकेच्या माथी पडले आहे. ते वीजबिल महापालिकेला भरावे लागणार आहे.

नगर  – महापालिका निवडणुकीत मतदारांना आपले करण्याची एकही संधी सध्या इच्छुक उमेदवार सोडत नाही. दिवाळीत घरपोहोच मिठाई, शुभेच्छा कार्ड पाठविले. काहींना मतदारांना किराणा देखील भरू दिला. परंतू ही मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर मतदारांकडून विकास कामांची होणार मागणी देखील आता स्वखर्चातून ते पूर्ण करीत आहेत. त्यामुळे ज्या चौका व गल्लीबोळात अंधाराचे साम्राज्य होते. त्या ठिकाणी अचानक दिव्यांचा प्रकाश पडला आहे. इच्छुकांनी स्वखर्चातून हे दिवे बसवून मतदारांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तर रस्त्यांची कामे देखील केली आहेत.

-Ads-

विशेष म्हणजे विद्यमान नगरसेवकांनी देखील दिवे बसून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. गेली पाच वर्ष विकास कामे करता आली नाही. ती आता करण्याचा खटाटोप या नगरसेवकांकडून केला जात असल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे. येत्या 9 डिसेंबरला महापालिकेच्या 68 जागांसाठी मतदान होत आहे. उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांनी सध्या प्रभागात छोटी-छोटी विकास कामे करण्याचा तडाखाच लावला आहे.

मतदारांनी दिवे नाही अंधार पडतो असे म्हटले की लगेच विद्युत कर्मचारी बोलावून त्याला पैसे देवून दिवे बसविण्यात येत आहे. गटारीवर झाकन नाही मग लगेच सिमेंटचे झाकन टाकण्यात येत आहे. रस्ता धड नाही, रस्त्याने चालता येत नाही असे मतदार म्हटल्यानंतर लगेच मुरूम टाकण्यात येत आहे. काही इच्छुकांनी तर लगेच नव्याने रस्ताच केला आहे. अर्थात ही लहानसहान विकास कामे त्यांनी स्वखर्चातून केली आहेत.

शहरात महापालिका, आमदार, खासदार निधीतून पथदिवे, हायमाक्‍स बसविण्यात आले आहे. तरीही काही चौक व गल्लीबोळात दिवे नसल्याने अंधार पडलेला असतो. पथदिवे आहे. पण ते बंद आहे. ते देखील दुरुस्त करून चालू करण्यात आले आहे. नव्याने दिवे घेवून ते बसविण्यात आले. या दिव्यांसाठी मोठे खांब देखील रोवण्यात आले आहेत. अर्थात ही कामे महापालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणेमार्फत नाही तर खासगी कामगारांकडून ही कामे करू घेण्यात आली आहेत.

अर्थात अशी परस्पर कामे करता येत नाही. पण मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुक सध्या परस्पर विकास कामे करीत आहे. शहरात कोणतेही विकास कामे करतांना महापालिकेत अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. परंतू या ठिकाणी कोणतेही सोपस्कार करण्याची गरज नसल्याने इच्छुक परस्पर विकास कामे करू मोकळा होत आहे. तसेच काम झाल्यानंतर लगेच संबंधित कॉलनी, अपार्टमेंट, गल्ली या भागातील मतदारांना कामे झाल्याचे दाखवित आहे.

विद्यमान नगरसेवक महापालिका यंत्रणेचा वापर करू घेत असून पथदिवे, नव्याने दिवे बसविण्यात कामे करू घेत आहेत. अर्थात त्यांना महापालिकेतील विकास कामांचा सोपस्कार माहिती असल्याने आचारंसहिता लागू होण्यापूर्वीच कामे मंजूर करू घेतली आहे. तसेच काही विद्युत साहित्य देखील त्यांनी ताब्यात घेवून ठेवली आहे. त्यामुळे आता मतदारांच्या मागणीनुसार चौक व गल्लीबोळात तसेच कॉलनीत दिवे उभारत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)