नगर मनपा निवडणूक 2018 : अजूनही मिटेना मतदार यादीचा घोळ

प्रभाग 15 मध्ये बाहेरील मतदार घुसविले : गीताजंली काळे काळे यांचा शिवसेनेवर आरोप

नगर – महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्येही घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या यादीबाबतही अनेक तक्रारी आता येवू लागल्या असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची याची दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रभाग 15 मध्ये बाहेरील मतदार घुसविले असून निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना पैसे देवून शिवसेनेने तब्बल 550 मतदार घुसविल्या आल्याचा आरोप माजी उपमहापौर गीताजंली काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

प्रभाग 15 मध्ये शेजारच्या प्रभाग 13 मधील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभाग 13 मधील मतदारांची नावे वर्षानुवर्ष त्याच भागात असतांना त्यांना अन्य ठिकाणी घुसविण्यात आले आहे. प्रभाग 15 मधून निवडणूक रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केला आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली तेव्हा हे 550 मतदार प्रभाग 13 मध्ये होते. त्यावेळी या मतदार यादीबाबत कोणीही हरकत घेतली नव्हती. असे असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात प्रभाग 13 मधील या मतदारांचा समावेश प्रभाग 15 च्या मतदार यादी करण्यात आला आहे.

वास्तविक पाहता हे मतदार भौगोलिक दृष्ट्या व अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभाग 15 मध्ये येत नाही. काही मतदार नेप्ती, केडगाव अशा ठिकाणी रहिवासी असतांना त्यांचा प्रभाग 15 मध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा मतदारांचा या प्रभागाशी काही संबंध नसतांना त्यांचा भ्रष्ट मार्गाने निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणताही सर्व्हे न करता तसेच हरकतींची शहानिशा करता समावेश करण्यात आला आहे.

याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी येत्या दोन दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. टिळक रोड, भापकर पुतळा, शिल्पा अपार्टमेंट, कानडे चाळ, पडोळे चाळ, जाधव मळा या भागातील मतदारांचा समावेश प्रभाग 15 च्या मतदार यादीत करण्यात आला आहे. असा आरोप नितीन भुतारे, गणेश अवसरकर, प्रितेश गुगळे, चंद्रकांत पाटोळे, सुरेश गायकवाड, अनिकेत आगरकर, सुधाकर डांगळे, हेमंत थोरात, श्रीकांत साठे, सुनील काळे यांनी केला आहे.

याबरोबर नगरसेविकास रुपाली वारे या प्रभाग क्रमांक 2 मधील रहिवासी असतांना त्याचे नाव प्रभाग क्रमांक 4 च्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्याबरोबर प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक 4 मध्ये करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मतदारांचा घोळ झाल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीमधील घोळामुळे महापालिका निवडणूक वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)