मतदार यादीवर हरकतींचा पाऊस

संग्रहित छायाचित्र

तब्बल 1 हजार 800 हरकती; 6 नोव्हेंबरला होणार सुनावणी

नगर – महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीत घोळ झाल्याचा आरोप करीत इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या आहेत. आज अखेरपर्यंत हरकतींची संख्या 1 हजार 800 वर गेली आहे. हरकतदारांची संख्या मोठी असल्याने प्रारूप मतदारयादी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका प्रशासनाने 25 ऑक्‍टोबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या मतदार यादीवरून मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व मतदारांनी हरकती दाखल करण्यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग कार्यालयासह मुख्यालयात गर्दी केली होती.

एकाच कुटुंबातील व्यक्‍तीचे नाव वेगवेगळ्या प्रभागात, मतदार यादीत नाव नसणे, मयत मतदारांच्या नावांचा समावेश, पती-पत्नीचे नाव एका प्रभागात तर, मुलाचे नाव दुसऱ्या प्रभागात अशा हरकती दाखल करण्यात आल्या. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी अखेरची मुदत असल्याने हरकतदारांची मोठी गर्दी उडाली आहे. कालपर्यंत महापालिककडे 900 हुन अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यात आज आणखी भर पडली आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर मनपा प्रशासनाकडून दि. 31 ऑक्‍टोबरपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आज दुपारपर्यंत केडगाव-बुरूडगाव प्रभाग कार्यालयात 37, माळीवाडा 15, झेंडीगेट 1, व सावेडी प्रभाग कार्यालयात 19 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. दि. 6 नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान हरकतींच्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)