नगर_पालिका_रणसंग्राम_2018 : रविवार ठरला प्रचारासाठी पर्वणी

रॅली, महिला मेळावे, पदयात्रा काढून उमेदवारांनी साधला मतदारांशी संवाद

नगर – महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. आज रविवार असल्याने बहुतांशी मतदार घरीच सापडणार असल्याने उमेदवारांनी ही पर्वणीसाधत आपल्या समर्थकांसह मतदारांची भेट घेऊन प्रचार केला.  महानगरपालिकेचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांना आता सहाच दिवस उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यामुळे प्रचाराचे फलक लावणे, वाहनांद्वारे प्रचार करणे, समर्थकांसह प्रचारपत्रके वाटण्यात उमेदवार सध्या गुुंतले आहेत.

घरटू घर जाऊन मतदारांना भेटण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आता प्रचारासाठी केवळ पाचच दिवस उरले आहेत. शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे उत्तरोत्तर उमेदवारांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रचारपत्रके वाटणे, प्रभागातून रॅली काढून उमेदवार शक्तिप्रदर्शनही करत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त गर्दी जमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

प्रचारादरम्यान प्रथमच रविवारची पर्वणी उमेदवारांना मिळाली. त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग प्रचारासाठी करून घेतला. रविवार असल्याने बहुतांशी मतदार घरीच सापडणार असल्याने उमेदवारांनी प्रभागातून सकाळपासूनच आपल्या समर्थकांसह पदयात्रा काढल्या होत्या. यावेळी प्रचारपत्रके मतदारांना देऊन मत देण्याचे आवाहन उमेदवार करत होते. या पदयात्रांत उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यही भाऊ, काका, मामा, ताई, मावशी म्हणतू मतदारांचे आशीर्वाद घेऊन मत देण्याची विनंती करत होते.

अनेक प्रभागांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या पदयात्रांत भाग घेऊन मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीतर्फे आमदार संग्राम जगताप यांनीही आपल्या समर्थकांसह उमेदवारांसाठी विविध प्रभागांतून पदयात्रा काढली होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या प्रचारासाठीही माजी आमदार अनिल राठोड यांनी प्रचार केला. मात्र कॉंग्रेसच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविल्याने उमेदवारांनी आपल्या पातळीवरच प्रभागात प्रचार केला.

भाजपातर्फे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ना. मुंडे यांच्या उपस्थितीत सकाळी पावणेदहाला केडगाव येथील कायनेटिक चौक ते विद्यानगर भागात रॅली काढण्यात आली होती. सकाळी साडेअकरा वाजता माळीवाडा येथील शिवाजी पुतळा-माळीवाडा-आशा टॉकिज चौक-चितळे रस्ता अशी रॅली काढण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता आरटीओ कार्यालय-मिस्किन मळा, प्रोफेसर कॉलनी चौक-वैदूवाडी-भिस्तबाग-भगवानबाबा चौक-एकवीराचौक अशी रॅली काढण्यात आली. तसेच दुपारी बारा वाजता महिला मेळावाही घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)