अहमदनगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला

9 डिसेंबरला मतदान; दिवाळीपूर्वीच आचारसंहितेचा बॉम्ब फुटला

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र दाखल करणे- 13 ते 20 नोव्हेंबर.
नामनिर्देशनपत्रांची छाननी – 22 नोव्हेंबर.
उमेदवारी मागे घेणे – 26 नोव्हेंबरपर्यंत
निवडणूक चिन्ह वाटप – 27 नोव्हेंबर
मतदान – 9 डिसेंबर 2018
मतमोजणी – 10 डिसेंबर 2018
निकालाची राजपत्रात प्रसिद्धी – 13 डिसेंबर 2018 पर्यंत

नगर : नगर महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी (दि.1) जाहीर केला आहे. महापालिकेच्या 68 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. दिवाळीपूर्वी आजपासून आचारसंहितेचा बॉम्ब फुटल्याने अनेकांनी आयोजित केलेल्या व नियोजित कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे. 13 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांची दिवाळी धावपळीत जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून, मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत.

13 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी 6 नोव्हेंबरला अंतिम होणार होती. त्यामुळे यापूर्वी आचारसंहिता लागू होईल, अशी अपेक्षा नसल्याने अनेक राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांची नियोजन केले होते. परंतु मतदार यादी अंतिम होण्यापूर्वीच आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू करण्यात आल्याने आता सर्व कार्यक्रमांना ब्रेक बसला आहे.

उद्या महापालिकेच्या महासभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 3 नोव्हेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ते आता रद्द होणार आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या महासभेबाबत प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले आहे. या सभेत महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)