आर्थिक बळामुळे मतदारयाद्यांमध्ये घोळ

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा आरोप : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

नगर – आर्थिक आमिषांना बळी पडलेले अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाशी संगनमत करून महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यांच्यासह निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याची माहिती राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिवसेनेचे नगर दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तरप्रमुख रावसाहेब खेवरे, नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विक्रम राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राठोड म्हणाले, “महापालिकेने तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये जाणिवपूर्वक घोळ करण्यात आला आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमधील मतदार यांद्यामध्ये फेरफार करण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर काम सोपवले होते, त्यांनी राजकीय पक्षांशी संगनमत केली आहे. यासाठी मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे.’

मतदार यादीवर 900 पेक्षा जास्त हरकती घेण्यात आल्या आहेत. यावरून याद्यांमध्ये किती घोळ आहे, याचा अंदाज येतो. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभागांमध्ये हा घोळ अधिकच जाणवतो. हे करण्यामागे महापालिकेतील अधिकारी कारणीभूत आहेत. हा घोळ करणाऱ्या अधिकाऱ्याची आपण नावाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असेही राठोड यांनी सांगितले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदार याद्यांतील घोळाच्या पार्श्‍वभूमीवर बीएलओ आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर हरकतींची तपासणी सुरू झाली. बीएलओ या हरकतींची तपासणी सुरू करताच त्यांना दमदाटी करून हाकलून देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.

याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार दाखल होणार असल्याचेही अनिल राठोड यांनी सांगितले. या मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने शहरातील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत रितसर तक्रार करणार आहे. लोकशाहीला हा प्रकार मारक आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. शिवसेना तो खपवून घेणार नाही, असेही राठोड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)