निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

निवडणुकीसाठी महसूल व महापालिकेतील तब्बल 30 अधिकाऱ्यांचा समावेश

नगर – महापालिका निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर वेगाने कामकाज करण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च आदी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी याप्रमाणे विभागीय आयुक्‍तांनी ही नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच जाहिर होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 30 अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली असून त्यात महसुल विभागाचे 13 अधिकारी आहेत. निवडणुकीच्या कामासाठी उपजिल्हाधिकारी किंवा उपायुक्‍त दर्जाचे अधिकारी आवश्‍यक आहे. त्यानुसार नाशिक विभागीय आयुक्‍त राजाराम माने यांनी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती तातडीने केली आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्‍ती पत्र देण्यात येईल.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गोंविद दाणेज, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी प्राजित नायर, उपजिल्हाधिकारी वामन कदम, विशेष भूसंपादन अधिकारी शाहुराज मोरे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांची नियुक्‍ती करण्यात आली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल दौंडे, सुधीर पाटील उमेश पाटील, सदाशिव शेलार, माणिक आहेर, एफ.आर.शेख या महसुल अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्‍के, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, अभियंता कल्याण बल्लाळ, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे, पाणीपुरवठा अधिकारी महादेव काकडे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, नगरसचिव शहजहान तडवी, अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर, सदाशिव रोहकले यांच्यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात येणार असून या कक्षाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांच्यावर टाकण्यात आली आहे. अभियंता परिमल निकम व उद्यान विभागाचे प्रमुख किसन गोयल, पद्धत अधिकारी अंबादास साळी यांची सहाय्यक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्च तपासणी कक्षप्रमुख म्हणून लेखापरिक्षक चंद्रकांत खरात यांची नियुक्‍ती करण्यात आली असून मुख लेखा व वित्त अधिकारी प्रविण मानकर व सहाय्यक नगररचनाकार वैभव जोशी यांची सहाय्यक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आल्याने आता केवळ निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्याची प्रतीक्षा आहे. मतदार यादी कार्यक्रम संपल्यानंतर हा कार्यक्रम जाहिर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)