भाजपची विनापरवाना प्रचाराची पाच वाहने जप्त

नगर – भाजपकडून विनापरवाना वाहनांद्वारे शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार केला जात असल्याच्या तक्रारीनंतर खुद्द उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्लीगेट परिसरातील भाजपच्या 5 प्रचार वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही वाहने ताब्यात घेऊन आरटीओ कार्यालयात लावली आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी वाहनांद्वारे प्रचार करताना निवडणूक प्रशासनाने विविध परवानग्या तसेच नियम ठरवून दिलेले आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्‍त जे.एस. सहारिया यांनी शुक्रवारी (दि.30) नगरमध्ये अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आहेत. त्या अपुषंगाने प्रशासनाने नियम अतिशय कडक केलेले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मोहीमही सुरू केलेली आहे.

या दरम्यान भाजपकडून कुठलीही परवानगी न घेता डिजिटल प्रचार वाहने तसेच इतर वाहनांवर फलक व ध्वनीक्षेपक लावून बेकायदेशीरपणे प्रचार केला जात असल्याची तक्रार शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र दळवी व गिरीश जाधव यांनी शनिवारी (दि.1) सकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांच्याकडे केली. ही वाहने दिल्लीगेट परिसरात असल्याची माहितीही दिली.

या तक्रारीवरून आरटीओ पाटील यांनी स्वतः पथकासमवेत येवून 1 डिजिटल प्रचार वाहन व अन्य 4 प्रचार वाहने ताब्यात घेतली. ही वाहने आरटीओ कार्यालयात नेवून लावण्यात आली असून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.
जर सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या असतील तर वाहने सोडली जातील, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)