नगर मनपा रणसंग्राम 2018 : मतदार याद्यांमध्ये घोळ घालणारे वाचणार नाहीत

राज्य निवडणूक आयुक्तांसमोर जिल्हाधिकारी यांची माहिती

मयत मतदरांच्या स्वतंत्र याद्या तयार करा

मतदानात गैरप्रकार टाळण्यासाठी मयत मतदरांचे नाव देखील मतदार याद्यांमध्ये घातले जाते. मयत मतदारांचे मत होऊ नये यासाठी काळजी घ्या. त्यांच्या स्वतंत्र याद्या प्रभागनिहाय तयार करा. या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर द्या. मयत मतदाराच्या नावाखाली “डी’, असा शब्दप्रयोग करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने यावेळी दिल्या.

नगर : महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये घोळ घालणाऱ्यांवर कारवाई निश्‍चित होणार आहे. त्यांना कारवाईपासून कोणीही वाचू शकत नाही. या घोळाची चौकशी देखील अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्वर सहारिया यांच्या उपस्थित आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

-Ads-

आयुक्त सहारिया यांनी महापालिका निवडणुकीचा प्रशासकीय पातळीवरचा आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करत होते. महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू होते. परंतु या याद्यांमध्ये अनेक घोळ झाले आहे. प्रभाग रचनेत अनेक मतदारांचे ठिकाण बदलले गेले आहेत. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या तक्रारी देखील होत्या.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, “मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. तो दुरूस्त करण्यात देखील आला आहे. परंतु घोळ घालणारे कारवाईपासून वाचणार नाहीत. चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यावर निश्‍चित अशी कारवाई होईल.’ सहारिया म्हणाले, “महापालिकेसाठी आयोग मतदार याद्या पुरवित नाही. विधानसभा मतदार संघाच्याच याद्या वापरल्या जातात. या याद्यांमध्ये दुरूस्त करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशाकीय पातळीवर होते. तरी देखील मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाची चौकशी जिल्हाधिकारी करत आहे. या चौकशीनंतर ते दोषींवर निश्‍चितच कारवाई करतील.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)