कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांसाठी ग्रामीण जिल्हाध्यक्षांची सही

शहर जिल्हाध्यक्षांच्या अधिकारांवर विळदमधून गंडांतर

नगर – महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवार शोधताना दमछाक झाली. केडगावचा कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला आघाडीचा चर्चा राष्ट्रवादीबरोबर सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने उद्‌ध्वस्त केला. त्यातून कॉंग्रेस अजूनही सावरली नाही, तोच शहराचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष यांच्या अधिकाऱ्यांवर गंडांतर आल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात कॉंग्रेसकडून उमेदवार पुरस्कृत करताना त्यांना तसे पत्र देताना कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीचा आधार घेतला आहे. या स्वाक्षरीमुळे प्रभार शहर जिल्हाध्यक्ष यांना पदमुक्त केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

केडगावातील राजकीय भूकंपातून कॉंग्रेस अजून सावरत आहे. विळदमधून त्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहराच्या राजकारणावर पकड मिळविण्यासाठी आता पुरस्कृत उमेदवारांचा खेळ सुरू केला आहे. दरम्यानच्या काळात प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी पदमुक्त केल्याची चर्चा सुरू झाली होती. पक्षातंर्गतील सूत्रांकडून तशी माहिती बाहेर आली. या माहितीवर मात्र कोणीही बोलण्यास तयार नव्हते.

निवडणुकीनंतर निर्णय होईल, असे मात्र सांगण्यात येत होते. आता मात्र निवडणुकीत उमेदवारांना पुरस्कृत करताना ही बाब समोर आली आहे. पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्या स्वाक्षरीने पत्र दिले आहे. शेलार यांची ही स्वाक्षरीने आता पुन्हा एकदा प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष यांच्या पदमुक्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. विळदचे हे गंडांतर असल्याचे खुलेपणाने बोलू जाऊ लागले आहे.

कॉग्रेसने भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी लोंढे यांना पुरस्कृत केले आहे. तसे पत्र जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजकीय खेळीने केडगावचे कॉंग्रेसचे उमेदवार मनोज कोतकर यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसने राहुल चिपाडे यांना एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केली होती. चिपाडे यांनी पक्षातर्फे अर्ज भरला नसल्याने छाननीत तो ग्राह्य धरण्यात आला नाही. लोंढे यांनी याचवेळी त्यांचा अर्ज कायम ठेवला होता. कॉंग्रेसने त्यांना अता पुरस्कृत केले आहे. बंडखोर लोंढे यांना कॉंग्रेसने पुरस्कृत करून भाजपवर पलटवार केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)