नगर महापालिका रणसंग्राम : गांधी, खरपुडे, परदेशी यांच्याकडून अपील दाखल 

 खंडपीठाच्या आदेशाकडे लक्ष; सोमवारी निर्णय 


बाळासाहेब बोराटे यांचे अद्याप अपील नाही 

-Ads-

नगर – महापालिका निवडणूक छाननीत भाजपचे चार ते शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने महापालिका निवडणुकीचे समिकरण बदलेले असून महापौरपदाचे दावेदार ठरणारे बाद झाल्याने त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारी अर्ज बाद झालेल्या खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी त्यांच्या पत्नी दिप्ती गांधी, सुरेश खरपुडे व प्रदीप परदेशी यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली असून आपले अपील दाखल केले आहे.

मात्र शिवसेनेचे बाद उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी अद्यापही अपील दाखल केले नाही. सध्या तरी या खंडपीठात याबाबत काय आदेश होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. येत्या सोमवारी याबाबत निर्णय होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत खासदार दिलीप गांधी यांच्या घराच्या अतिक्रमणावरून सुपुत्र सुवेंद्र गांधी व सुन दिप्ती गांधी याचा उमेदवारी अर्ज बाद झाला. गांधी यांच्या अतिक्रमणाबाबत शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी हरकत घेतली होती. तर दिप्ती गांधी यांच्या उमेदवारीला विजय पटवेकर यांनी हरकत घेतली होती. बोराटे यांच्या अर्जावर राष्ट्रवादीचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय घुले यांनी हरकत घेतली होती.

बोराटे यांच्या घरावरील मोबाईल मनोरा व त्याची थकबाकी हा हरकतीचा मुद्दा होता. परदेशी यांच्याविरोधात अनधिकृत बांधकाम हा मुद्द प्रभावी ठरला. छाननीत या हरकती प्रभावी ठरल्याने या उमेदवारांची दांडी गुल झाली आहे. या सर्व उमेदवारांनी आता खंडपीठात अपील दाखल केले आहे.

शनिवारी दुपारी सर्वांच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात ऍड. नितीन गवारे यांनी अपील दाखल केले आहे. या अपीलावर न्या. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे. यावर आता सोमवारी निर्णय होणार आहे. त्यामुळे नगरकरांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. बोराटे यांनी अपील दाखल केलेले नाही. त्यामुळे त्याचा अर्ज बाद राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)