नगर महापालिका रणसंग्राम : 337 मतदान केंद्रांची यादी जाहीर

नगर – महापालिका निवडणुकीसाठी मतदानासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 337 मतदान केंद्राची यादी जाहीर केली आहे. त्या त्या प्रभागातील शाळांमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉन बॉस्को विद्यालय, ज्ञानसंपदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा मराठा नूतन मराठी विद्यालयात मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ. ना. ज. पाऊलबुधे माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथामिक शाळा, तवलेनगर आणि लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयत मतदान होईल. प्रभाग 3 मध्ये जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा, पी. ए. इनामदार शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, मौलाना आझाद उर्दू शाळा ही मतदान केंद्र असणार आहे.

प्रभाग क्रमांक 4 मध्ये आनंद विद्यालय, सेंट सेव्हिअर्स हायस्कूल, तारकपूर, यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालय, फकीरवाडा, प्रभाग क्रमांक 5 मध्ये समर्थ विद्या मंदिर, सावेडी, बजरंग विद्यालय, अश्‍वमेध विद्यालय, मार्कंडेय विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वैदूवाडी, सेंट मोनिका विद्यालय, झोपडी कॅन्टीन.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये रेणावीकर विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, केशवराव गाडीलकर विद्यालय, जिल्हा परिषदेच्या जागेतील महापालिकेची छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा, भूतकरवाडी चौक, प्रभाग 7 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव व नागापूर प्रभाग क्रमांक 8- माणिकताई करंदीकर शाळा, नीलक्रांती चौक, गोकुळ पाळणाघर, बागरोजा हाडको, जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर, कल्याण रोड, उध्दव ऍकॅडमी इंग्लिश मीडियम शाळा, जाधवनगर, बाळासाहेब केशव ठाकरे शाळा, गांधीनगर.

प्रभाग क्रमांक 9- पेमराज सारडा कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल, लालटाकी, महापालिका तेलगू शाळा, तोफखाना, सीताराम सारडा विद्यालय, बागडपट्टी, प्रभाग 10- महापालिकेची उर्दू आणि मराठी शाळा, बेलदार गल्ली, नागोरी मिसगर उर्दू शाळा, राधाबाई काळे महाविद्यालय, तारकपूरमागे, सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल, तारकपूर, सेंट सेव्हिअर्स स्कूल, तारकपूर.

प्रभाग क्रमांक 11- महापालिका शाळा नंबर 22 व 25 झेंडीगेट, युनियन ज्युनिअर कॉलेज, हातमपुरा, क्‍लेरा ब्रूस हायस्कूल, कोठी रोड, प्रभाग क्रमांक 12- श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल, महापालिका शाळा, माळीवाडा, राष्ट्रीय पाठशाळा, स्टेशन रोड, चॉंद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, प्रगत विद्यालय, गांधी मैदान, मार्कंडेय विद्यालय, गांधी मैदान, बाई इचरजबाई फिरोदिया हायस्कूल, नवीपेठ.

प्रभाग क्रमांक 13- जानकीबाई आपटे, मूकबधीर विद्यालय, टिळक रोड, भाऊसाहेब फिरोदिया, माळीवाडा, दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक, समर्थ शाळा, सांगळे गल्ली, चितंबर कन्या विद्यालय, पार्वतीबाई डहाणूकर विद्यालय, प्रभाग क्रमांक 14- दामोदर विधाते विद्यालय, सारसनगर, रामकृष्ण इंग्लिश स्कूल वाकोडी रोड, आयटीआय, बुरुडगाव रोड.

प्रभाग 15 – शायनी इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या कॉलनी, कारमेल कॉन्व्हेंट शाळा, लिंक रोड, डॉ. आंबेडकर आदर्श शाळा, स्टेशन रोड, प्रभाग 16- जिल्हा परिषद प्राथामिक शाळा, भूषणनगर व शिवाजीनगर, शाहूनगर-केडगाव, अंबिका विद्यालय, ताराबाई कन्या विद्यालय. प्रभाग क्रमांक 17- जिल्हा परिषद शाळा, इंदिरानगर, अंबिकानगर, सोनेवाडी रोड, मोहिनीनगर, विद्या प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय, केडगाव देवी रोड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)