लाखेफळमध्ये दुरंगी,एरंडगावमध्ये चौरंगी लढत

दोन ग्रामपंचायती निवडणुकीत वाढली चुरस

शेवगाव – तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या बुधवारी (दि.26) होत आहेत. जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र ग्रामपंचायतीची मान्यता मिळालेल्या लाखेफळमध्ये दूरंगी तर एरंडगावमध्ये चौरंगी लढत होत आहे. दोन्ही ग्रामपंचायतीसाठी 16 जागासाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे.

-Ads-

एरंडगावमध्ये तीन प्रभाग असुन आठ जागेसाठी 31 उमेदवार आहे. प्रभाग क्र. 3 मध्ये अनुसुचित जातीसाठी एकाही मंडळास उमेदवार न मिळाल्याने ही जागा रिक्‍त राहिली आहे. येथे 882 मतदार आहेत. सरपंचपदासाठी जगन्नाथ नामदेव भागवत, भारत रामराव भागवत, मनोहर मधुकर भागवत व गोकुळ शेषेराव भागवत असे चार मंडळाचे उमेदवार आहेत. सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी खुले आहे.

लाखेफळ ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथे सविता शरद सोनवणे व प्रिया हनुमंत बेळगे अशी सरळ लढत होत आहे. प्रभाग तीन मधील सात जागांसाठी 14 उमेदवार आपले भविष्य अजामावित असून येथे 554 मतदार आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करून हायटेक प्रचार सुरू आहे . बुधवार दि 26 सप्टेंबरला मतदान होणार असून 27 सप्टेंबर ला मतमोजणी आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)