नगर महापालिका रणसंग्राम : बिनविरोधची परंपरा यंदा राखणार का

गेल्यावेळेच बोराटे यंदा निवडणुकीतून बाद

नगर – महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एक किंवा दोन उमेदवार बिनविरोध झाल्याची आजवरची परंपरा या निवडणुकीत राखली जाण्याची शक्‍यता कमी आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार यावेळी देण्यात आले असून अपक्ष वगळता पक्षीय उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्‍यता नाही.

मागील दोन निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे उमेदवार बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे. सन 2009-10 मध्ये झालेल्या महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप व कॉंग्रेसचे सुभाष लोंढे यावेळी बिनविरोध झाले होते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे हे बिनविरोध झाले होते. परंतू यावेळी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता कमी आहे.

बाळासाहेब बोराटे यांच्यासह गेल्यावेळी नगरसेविकास शितल जगताप या देखील बिनविरोध होती अशी चर्चा होती. परंतू ते झाले नाही. बोराटे गेल्या निवडणुकीत बिनविरोध झाले होते.

परंतू यावेळी ते निवडणुकीतूनच बाद झाले आहे. त्याचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थकबाकीच्या कारणावरून अर्ज बाद केला आहे. यावेळी सर्वच प्रभागाचा विचार केला तर सर्व प्रभागात चुरशीची लढत असल्याने माघारीचा प्रश्‍न येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)